भाजप 250 जागाही जिंकणार नाही

भाजप 250 जागाही जिंकणार नाही

इलेक्ट्रोल बॉण्डच्या नावावर काँग्रेसची खाती गोठवली जात असून लोकशाहीसाठी हे घातक आहे. भाजप 400 पारचा दावा करत आहे, पण हा पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत 250 जागाही जिंकणार नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी भाजपवर हल्ला चढवला. जयपूर येथील सभेत ते बोलत होते.

देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे काम भाजप करत आहे. माजी मुख्यमंत्री आणि माजी मंत्र्यांना ईडी, सीबीआयची भीती दाखवून तुरुंगात डांबले जात आहे. ही लोकशाहीसाठी चांगली बाब नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, डुंगरपूर बांसवाडा जागेसाठी लवकरच उमेदवाराची घोषणा करू, असेही ते म्हणाले. 6 एप्रिल रोजी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात येईल. यात तरुणांसाठी रोजगार, शेतकरी, महिलांसाठी विविध योजना अशा पाच गॅरंटी या जाहीरनाम्याच्या माध्यमातून देण्यात येतील, असेही गेहलोत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;