धारावीत एक घर, एक तास सर्वेक्षणाचा बोऱ्या वाजला

धारावीत एक घर, एक तास सर्वेक्षणाचा बोऱ्या वाजला

स्थानिकांचा विरोध झुगारून धारावीत सोमवारपासून सर्वेक्षणाच्या दुसऱया टप्प्याला म्हणजेच डोअर टू डोअर सर्वेक्षणाला सुरुवात झाली. यात घरोघरी जाऊन रहिवाशांची माहिती गोळा करण्यात येतेय. माहिती मोबाईल अॅपवर अपलोड केल्यानंतर ती कन्फर्म करण्यासाठी रहिवाशाच्या मोबाईलवर येणारा ओटीपी टाकणे गरजेचे असून त्यानंतरच सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण होते. कधी रेंज नसल्यामुळे तर कधी ओटीपी वेळेत येत नसल्यामुळे एका घराच्या सर्वेक्षणासाठी साधारण एक ते सवा तासाचा वेळ लागतोय.

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत डीआरपीपीएलकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. 18 मार्चपासून माटुंगा पूर्वेला असलेल्या कमला रमणनगरातून सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. झोपडय़ांना युनिक आयडी क्रमांक दिल्यानंतर परिसराचे लेसर मॅपिंग करण्यात आले, ज्याला लायडर सर्वेक्षण असे म्हटले जाते. त्यानंतर सोमवारपासून कमला रमणनगर येथूनच घरोघरी जाऊन रहिवाशांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरु झाली.

– रहिवाशी सध्याच्या सदनिकेत कधीपासून राहतोय आणि त्याची मातृभाषा कोणती, कुटुंबातील व्यक्तींची संख्या आणि प्रत्येकाची शैक्षणिक पार्श्वभूमी, एकूण कौटुंबिक उत्पन्न, धारावीतच नोकरी करतात की धारावीबाहेर आदी प्रश्न रहिवाशांना सर्वेक्षणात विचारण्यात येत आहेत. सर्वेक्षण प्रक्रियेद्वारे गोळा केलेला डेटा, सर्वेक्षणाच्या शेवटी राज्य सरकारला सादर करण्यात येणार असून त्यानंतर राज्य सरकार झोपडीधारकाची पात्रता निश्चित करणार आहे.

पहिल्या दिवशी 50 झोपडय़ांचे सर्वेक्षण
पहिल्या दिवशी अंदाजे 50 झोपडय़ांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्व्हेसाठी पाच टीम तैनात करण्यात आल्या असून प्रत्येकी टीममध्ये पाच अधिकारी-कर्मचाऱयांचा समावेश आहे. सर्वेक्षणात जुनी आणि नवीन वीज बिले, मतदार ओळखपत्र, मतदार यादीची प्रत, गुमास्ता परवाना, दिलेली माहिती सत्य असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र यासारखी कागदपत्रे स्पॅन करण्यात येत आहेत. याशिवाय सदनिकाधारकांसह त्यांच्या काwटुंबिक छायाचित्रांचेही संकलन करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;