ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवरून सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवरून सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

प्रत्येक ईव्हीएममध्ये नोंदवली गेलेली सर्व मते आणि मतदारांनी खातरजमा केलेल्या पावत्या (व्हीव्हीपॅट स्लिप) यांची संपूर्ण गणना व्हावी अशी मागणी करणाऱया याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली.

सध्याच्या पद्धतीनुसार, एखाद्या लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून निवडलेल्या कोणत्याही पाच ईव्हीएममधील मते आणि मतदार पत्रिका पडताळून पाहिल्या जात असतात. तसे न करता आयोगाला सर्वच ईव्हीएममधील मते आणि मतदार पत्रिकांची मोजणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्ते वकील आणि सामाजिक कार्यकर्ते अरुणकुमार अग्रवाल यांनी केली आहे.

न्या. बीआर गवई आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने यावर आयोगाला नोटीस बजावली आहे. तसेच याच प्रकारचे निर्देश मागणारी एडीआर स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेशी ही याचिकाजोडली आहे.

वकील आणि कार्यकर्ते अरुण कुमार अग्रवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वाला आव्हान दिले आहे ज्यामध्ये आयोगाकडून व्हीव्हीपॅट पडताळणी क्रमानुसार होत असते. यात अनावश्यक विलंब होत असल्यामुळे या मार्गदर्शक तत्त्वालाही अग्रवाल यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. जर एकाच वेळी खातरजमा प्रक्रिया केली आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रात गणनेसाठी जास्ती कर्मचारी ठेवले तर संपर्ण व्हीव्हीपॅट खातरजमा 5 ते 6 तासांत पूर्ण करता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

स्लिप मतपेटीत टाकण्याची अनुमती द्या

मतदारांचे मत हे त्यांनी नोंदवल्याप्रमाणेच मोजले गेले आहे का याची पूर्ण खात्री करण्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्रणेने दाखवलेल्या मतदार पत्रिका मतदारांनाच प्रत्यक्ष पाहून मतपेटीत टाकण्याची परवानगी द्यावी, असे निर्देशही द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे.

व्हीव्हीपॅट म्हणजे काय…

ईव्हीएमशीच निगडीत असलेल्या व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) या स्वतंत्र मत पडताळणी उपकरण वा प्रणालीमुळे, मतदाराला त्याने दिलेले मत बरोबर नोंदवले गेले आहे याची खातरजमा करता येते. मतदाराने नोंदवलेल्या मताची एक पेपर स्लिप ही प्रणाली तयार करते जी मतदाराला फक्त पाहता येते.

व्हीव्हीपॅट यंत्रे 24 लाख आणि खातरजमा फक्त 20 हजार यंत्रांची

सरकारने सुमारे 25 लाख व्हीव्हीपॅट यंत्रे घेण्यासाठी जवळपास 5 हजार कोटी खर्च केले आहेत. सध्या फक्त वीस हजार यंत्रांमधील मतदार पत्रिकांचीच खातरजमा केली जाते. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम यांच्याबद्दल वेळोवेळी तज्ञांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच ईव्हीएम व व्हीव्हीपॅट गणनेतील विसंगतींकडेही वेळोवेळी लक्ष वेधण्यात आले आहे. यामुळे सर्वच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाव्यात आणि ही स्लिप मतपेटीत टाकण्याची अनुमती देऊन आपले मत नोंदवलेल्या मताप्रमाणेच मोजले जात आहे याची योग्य प्रकारे खातरजमा करण्याची संधी मतदाराला मिळावी, असा युक्तिवाद अगरवाल यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;