आयपीएल भविष्य, रिटेंशन, लिलाव आणि बरंच काही; बीसीसीआयने आयपीएल संघमालकांची बोलावली बैठक
‘आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा थरार सुरू असतानाच ‘बीसीसीआय’ने अचानक आयपीएल संघमालकांची बैठक बोलावली आहे. ही बैठक अहमदाबादमध्ये 16 एप्रिलला होणार आहे. या बैठकीत अनेक धोरणात्मक निर्णयांबाबत चर्चा होणार असून यात प्रामुख्याने आयपीएलचं भविष्य आणि खेळाडूंच्या रिटेंशन, लिलाव व सॅलरी कॅप अशा अनेक गोष्टींबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे.
‘बीसीसीआय’ने प्रत्येक फ्रेंचायझी मालकांना बैठकीचं निमंत्रण पाठवलं आहे. प्रत्येक संघमालकांना हे आमंत्रण पोहचलंदेखील आहे. हे सर्व संघमालक आपल्या सीईओ आणि कार्यकारी स्टाफसह बैठकीला हजर राहतील अशी अपेक्षा आहे. याचबरोबर फक्त संघमालकांसोबतदेखील बीसीसीआयची एक वेगळी बैठक होणार आहे. या बैठकीला ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा आणि आयपीएल चेअरमन अरुणसिंह धुमल हे बीसीसीआयचे अधिकारीदेखील उपस्थित असणार आहेत. या बैठकीचा अधिकृत अजेंडा अद्यापि जाहीर झालेला नाही. आयपीएल सीईओ हेमंग अमिन यांनी या बैठकीचे आमंत्रण दिले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List