पंकज अडवानीने राखले सीसीआय बिलियर्डस् क्लासिक जेतेपद

पंकज अडवानीने राखले सीसीआय बिलियर्डस् क्लासिक जेतेपद

विश्वविजेता आणि गतविजेता पंकज अडवानीने सर्वोत्तम फॉर्म राखताना चार तास चाललेल्या अंतिम सामन्यात 801 आणि 460 चे दोन दमदार ब्रेक करताना इंग्लंडच्या डेव्हिड कॉजियरचे आव्हान मोडून काढताना क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आयोजित सीसीआय बिलियर्डस् क्लासिक 2024 स्पर्धेचे जेतेपद राखले. सीसीआयच्या विल्सन जोन्स बिलियर्डस् हॉलमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात रविवारी पहिल्या दोन तासांच्या सत्राअखेर अडवानीने 593-570 अशी छोटेखानी आघाडी घेतली होती. त्यात 204 च्या ब्रेकचे 460 मध्ये रूपांतर केले. चॅम्पियन अडवानीने जेतेपद राखताना विजेत्याची ट्रॉफी आणि 2,50,000 रुपयांचे रोख बक्षीस पटकावले. उपविजेत्या कॉजियरला 1,50,000 रुपयांचा धनादेश आणि उपविजेता ट्रॉफी देण्यात आली. याव्यतिरिक्त, अंतिम फेरीत सर्वाधिक 801 ब्रेकसाठीचे 25,000 रुपयांचे बक्षीसही अडवानीला मिळाले. अखिल भारतीय सीसीआय बिलियर्डस् क्लासिक 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत विश्वविजेता आणि गतविजेता पंकज अडवानीसमोर इंग्लंडच्या डेव्हिड कॉजियरने आव्हान आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;