केंद्रीय तपास यंत्रणांबाबत सरन्यायाधीशांचे मोठे वक्तव्य, म्हणाले; देशविरोधी कारवाया…
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी आज एका व्याख्यान्यात बोलताना देशातील केंद्रीय तपास यंत्रणांवर ताशेरे ओढले. आज देशातील प्रमुख तपास यंत्रणांनी राष्ट्रीय सुरक्षा व आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांकडे सर्वाधिक लक्ष दिलं पाहिजे, असे चंद्रचूड म्हणाले.
“सीबीआयला भ्रष्टाचार विरोधी प्रकरणाव्यतिरिक्तही अन्य प्रकारच्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करायला लावला जात आहे. मर्यादित व्याप्तीमुळे प्रमुख तपास यंत्रणांनी केवळ आर्थिक गैरव्यवहार आणि देशविरोधी कारवाया असलेल्या प्रकरणांकडे सर्वाधिक लक्ष दिलं पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षेसी संबंधित महत्त्वाची प्रकरणं आहे. राष्ट्राविरुद्धच्या आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांवर या तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रकरण सीबीआयकडे सोपवणं चुकीचं असल्याचं स्पष्ट मत चंद्रचूड यांनी व्यक्त केलं. सीबीआयच्या स्थापना दिनानिमित्त 20व्या डीपी कोहली मेमोरिअल येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List