तुमच्याकडे धनाचे भांडार असतील… ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेअर केली भावनिक पोस्ट

तुमच्याकडे धनाचे भांडार असतील… ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेअर केली भावनिक पोस्ट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिवचे उमेदवारी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आज सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ओमप्रकाश यांनी त्यांचे दिवंगत वडिल पवनराजे निंबाळकर यांच्या सोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. त्या फोटोसोबत त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ”इतरांकडे धनाचे भांडार, पॉवर, सत्ता असेल पण माझ्याकडे राजेसाहेबांची (वडिलांची) पुण्याई व मायबाप जनतेचे आशिर्वाद असे दुहेरी शक्तिस्थळ आहे, असे त्यांनी या पोस्टमधून म्हटले आहे.

”सध्या सगळीकडे निवडणुकीची धामधूम आहे यात उमेदवार वेगवेगळे आराखडे लाऊन मतांची गोळा बेरीज करत आहे. याच निवडणुकीच्या धामधुमीत मला राजे साहेबांचे जुने सहकारी आणि माझ्या बरोबर सावली सारखे असणाऱ्या संतोष खोचरे यांना माझा आणि राजेसाहेबांचा एक जुना पण हृदस्पर्शी फोटो सापडला. तुमच्याकडे धनाचे भांडार असतील, सत्ता ,पॉवर असेल पण माझ्याकडे राजेसाहेबांची पुण्याई आणि मायबाप जनतेचे आशिर्वाद असे दुहेरी “शक्तिस्थळ” आहे. आता या शक्तिस्थळांच्या बळावरच मी निवडणुकीला सामोरे जात आहे. राजेसाहेब तुम्हाला अभिमान वाटेल असेच काम करत आलो आणि करत राहील ही ग्वाही देतो”, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथील सभेत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;