Lok Sabha Election 2024 आदित्य ठाकरे यांचा उद्या यवतमाळ- वाशिम लोकसभा दौरा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे मंगळवारी म्हणजेच 2 एप्रिल 2024 ला यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. यवतमाळ वाशिमचे शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज भरताना आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते मा. श्री. आदित्य ठाकरे ह्यांचा यवतमाळ-वाशिम लोकसभा दौरा!
दिनांक ०२ एप्रिल २०२४. pic.twitter.com/l1QqeeG9ln
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 1, 2024
या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांची दुपारी 12 वाजता यवतमाळच्या पोस्टल ग्राऊंडवर जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता पोस्टल ग्राऊंड ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात येणार असून त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी दाखल केला जाणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List