शालेय विद्यार्थ्यांनी अनुभवली जांभरुण गावातील प्राचीन कातळशिल्पं
कातळावर रेखाटलेल्या कातळशिल्पांचा खजिना कोकणाला लाभला आहे. प्राचीन काळात ही कातळशिल्पे रेखाटली गेली आहेत. विद्यार्थ्यांमध्येही या कातळशिल्पांचे कुतूहल आहे. जिल्हा परिषद जांभरुण शाळा क्र.1 च्या विद्यार्थ्यांनी जांभरुण गावातील कातळशिल्पाला भेट दिली. यावेळी कातळशिल्पाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा जांभरुण क्र.1च्या विद्यार्थ्यांनी जांभरुण गावाच्या सीमेवर असलेल्या कातळशिल्पाला भेट दिली. जांभरुण गावालाही कातळशिल्पाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. प्राचीन काळात मानवाने ही चित्रे रेखाटली आहेत. कातळावर काही भौगोलिक आकृत्या आहेत. त्या आकृत्या आजच्या युगात विचार करायला लावतात. काही प्राण्यांच्या आकृत्या आहेत. काही प्राण्यांच्या अशा आकृत्या आहेत की ते प्राणी कोकणात आढळत नाहीत. ज्या ठिकाणी कातळशिल्प कोरली आहेत तिथे 8 विहिरी खोदण्यात आल्या आहेत. विहिरीतील पाण्यात जाण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. या विहिरीला गावकरी तळं असे संबोधतात. मे महिन्यातही या विहिरीला पाणी असते. या कातळावर 9 मनुष्याकृती काढण्यात आल्या आहेत. हे सर्व विद्यार्थ्यांना यावेळी अनुभवता आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List