30 फूट उंच डोंगरावरून अमिताभ बच्चन यांनी मारली उडी, ‘तो’ थरकाप आणणार फोटो..

30 फूट उंच डोंगरावरून अमिताभ बच्चन यांनी मारली उडी, ‘तो’ थरकाप आणणार फोटो..

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे आताही अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन दिसतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी काही फोटो शेअर केले होते, त्या फोटोंमध्ये अमिताभ बच्चन हे देवांची पूजा करताना दिसले. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते.

अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिली आहेत. आजही लोक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांवर जोरदार प्रेम करतात. डाॅन, जंजीर, कुली असे अ‍ॅक्शन चित्रपटही अमिताभ बच्चन यांनी केले. नुकताच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. फक्त फोटोच नाही तर या फोटोसोबत त्यांनी मोठी आणि महत्वाची माहितीही शेअर केली.

या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांनी कोणत्याही सुरक्षेशिवाय 30 फूट उंच डोंगरावरून उडी मारली. फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, ॲक्शन सीक्वेन्ससाठी 30 फूट उंच डोंगरावरून टेक ऑफ… नो हार्नेस, फेस रिप्लेसमेंट नाही, VFX नाही आणि जर तुम्ही भाग्यवान असाल, तर लँडिंग… गाद्यांवर…ते पण दिवस होते मित्रांनो..

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ते डोंगरावरून उडी मारताना दिसत आहेत. आता अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसतंय. चाहते हे या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

अमिताभ बच्चन यांनी अनेक ॲक्शन चित्रपट केले आहेत. चित्रपटाच्या शूटिंगवेळी ॲक्शन सीन करताना मोठी दुखापत देखील अमिताभ बच्चन यांना झाली होती. अमिताभ बच्चन हे नेहमीच चित्रपटाच्या सेटवरील किस्से आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना अमिताभ बच्चन हे दिसतात. अमिताभ बच्चन यांचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;