पहिला तुमच्या बायकांच्या साड्या जाळा, बांगलादेशच्या पंतप्रधानांची टीका… वाचा काय आहे प्रकरण
काही महिन्यांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये बांगलादेशमध्ये सलग चौथ्यांदा शेख हसीना यांचे सरकार निवडून आले आहे. हसीना शेख यांना निवडून येण्यासाठी हिंदुस्थानने मदत केल्याचा आरोप प्रमुख विरोधी पक्ष बीएनपी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केला होता. तेव्हापासून या विरोधी पक्षांनी हिंदुस्थानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन तेथील जनतेला केले आहे. गेले काही महिने यावर मौन बाळगल्यानंतर आता शेख हसीना यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे एक संमेलन आय़ोजितक करण्यात आले होते. या संमेलनात बोलताना हसीना यांनी विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीवर जोरदार हल्ला चढवला. ”हे विरोधी पक्षातील नेते हिंदुस्थानी वस्तूंवर बहिष्कार घालायला सांगत आहेत. मला त्यांना विचारायचे आहे की त्यांच्या पत्नींकडे किती हिंदुस्थानी साड्या आहेत? ते का त्यांच्या पत्नींच्या साड्या रस्त्यावर टाकून त्यांना पेटवून देत नाहीत. हा सवाल सर्वांनी बीएनपी नेत्यांना विचारायला हवा, असा जबरदस्त टोला शेख हसीना यांनी लगावला आहे. ”गरम मसाले, कांदे, लसूण, आलं, सर्व प्रपकारचे मसाले हे हिंदुस्थानातून येतात त्यामुळे बीएनपी नेत्यांनी ते विकत घेऊ नये’ असे देखील शेख हसीना म्हणाल्या.
जानेवारी महिन्यात बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने 300 पैकी तब्बल 200 जागा जिंकत मुसंडी मारली. या निवडणुकीवर प्रमुख विरोधी पक्ष बीएनपी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी बहिष्कार टाकला होता
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List