वयाच्या 50 व्या वर्षी मलायका अरोरा होणार आई? व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणाल…

वयाच्या 50 व्या वर्षी मलायका अरोरा होणार आई? व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणाल…

अभिनेत्री मलायका अरोरा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायकाचं चर्चेत राहण्याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे तिचं वयाच्या 50 व्या वर्षातील बोल्डनेस आणि दुसरं कारण म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत असलेले रिलेशनशिप… सोशल मीडियावर देखील मलायका तिच्या व्हायरल फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत असते. आता देखील मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेत्रीने रॉम्प वॉक केला. अभिनेत्रीने बोल्ड आणि हॉट ड्रेसमध्ये वॉक करत चाहत्यांना घायाळ केलं. पण अनेकांचं लक्ष अभिनेत्रीच्या बेबी बम्पवर येऊन थांबलं. फोटो पाहिल्यानंतर अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

अभिनेत्रीचं बेबी बम्प पाहिल्यानंतर ‘मलायका प्रेग्नेंट आहे का?’ असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे. चाहते व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. पण यावर मलायका हिने कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

सांगायचं झालं तर, याआधी देखील मलायका गरोदर असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. तेव्हा अर्जुन कपूर याने मोठं वक्तव्य करत रंगणऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मलायकाच्या प्रेग्नंसीच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत अर्जुनने लिहिलं होतं, “तुम्ही सर्वांत खालची पातळी गाठली आहे आणि ते सुद्धा अत्यंत अनौपचारिक, असंवेदनशील आणि अनैतिक पद्धतीने तुम्ही ही बातमी दिली. संबंधीत पत्रकार सतत अशा बातम्या लिहितो. आम्ही फेक गॉसिप आर्टिकल्सकडे दुर्लक्ष करतो म्हणून त्याचं निभावून जातं. पण सहन करण्यापलिकडे झालं आहे.”

‘आमच्या खासगी आयुष्याशी खेळण्याची हिंमत करू नका’, असा थेट इशारा अर्जुनने या पोस्टद्वारे दिला होता. आता पुन्हा मलायका हिल्या प्रेग्नेंसीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पण यावर मलायका आणि अर्जुन यांनी मौन बाळगलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका – अर्जुन याच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

मलायका अरोरा आणि अरबाज खान

मलायका अरोरा हिचं पहिलं लग्न अभिनेता अरबाज खान याच्यासोबत झालं होतं. दोघांना एक मुलगा देखील आहे. मलायका – अरबाज यांच्या मुलाचं नाव अरहान खान असून तो 21 वर्षांचा आहे. अरहान याने आता पॉडकास्टच्या माध्यमातून करियरची सुरुवात केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;