सत्तेसाठी लाचारी पत्करणे योग्य नाही; जयंत पाटलांची तुफान टोलेबाजी, अजित पवार गटाला टोला

सत्तेसाठी लाचारी पत्करणे योग्य नाही; जयंत पाटलांची तुफान टोलेबाजी, अजित पवार गटाला टोला

आज देशात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, तरी काही जण म्हणतात आम्ही काम करण्यासाठी सत्तेत जात आहोत. सत्तेसाठी लाचारी पत्करणे योग्य नाही, अशी तुफान टोलेबाजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. नगर -दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांनी आज पाथर्डी येथे मोहटादेवीचे आशीर्वाद घेत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला टोला लगावला.

कोणत्या विचारामागे राहून आपण काम करतोय हे पाहणे गरजेचे आहे. राजकारणात विचार आणि आचार फार महत्वाचे असतात. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या मागे लोक मोठय़ा ताकदीने उभे आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हेच देशाची परिस्थिती बदलू शकतात यावर लोकांचा ठाम विश्वास आहे असेही ते यावेळी म्हणाले.

एकीकडे ‘न खाऊंगा न खाने दुंगा’ म्हणायचे आणि…

आज टीव्हीद्वारे जाहिराती प्रसारित केल्या जात आहेत. सर्वत्र सत्ताधारीच दिसतील अशी व्यवस्था केली जात आहे. जाहिरातींवर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असेल तर विचार करा यांची मिळकत किती असेल? या सरकारने इलेक्टोरल बॉण्ड्स नावाची व्यवस्था मध्यंतरी सुरू केली. विविध संस्थांच्या माध्यमातून यांनी पैसे घेतले त्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली. लोक कोर्टात गेल्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितले की सर्व व्यवहार जाहीर करा. हे जाहीर झाल्यावर कळले की निम्म्याहून अधिक पैसे हे भाजपला मिळाले आहे. ज्यांनी पैसे दिले त्यांच्यावर ईडी, आयटी या संस्थांद्वारे कारवाई सुरू होती. पैसे दिले तेव्हा सुटका झाली. हा उघड उघड भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचार कसा करावा याची नवी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रकार मागच्या पाच वर्षांत झाला. एकीकडे ‘न खाऊंगा न खाने दुंगा’ म्हणायचे आणि दुसरीकडे ‘जो भी है वो मैंही खाऊंगा’ असे केले जात आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

Lok Sabha Election 2024 – महायुतीत वादाची ठिणगी, बुलढाण्यातून भाजप नेत्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

10 वर्षाचा हिशोब द्या

टीव्हीवरील जाहिरातींच्या माध्यमातून काँग्रेसने 70 वर्षांत काय केले नाही हे सांगितले जात आहे. हे 10 वर्षे सत्तेत आहेत, यांनी 10 वर्षात काय केले याचीही एखादी जाहिरात करा. 70 वर्षांत काम केले म्हणून देश आज इथपर्यंत आला आहे. मागच्या 10 वर्षात यांनी देश अधोगतीकडे नेला. आज देशातील तरुणांना रोजगार नाही. पीएचडी झालेली मुले आज शिपायाच्या नोकरीसाठी अर्ज भरत आहेत. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये आपल्या देशाचा नंबर 111 वा लागतो. भाजप यावर उत्तर देईल का? का देश पुढे गेला नाही? यांचे उत्तर काय असेल तर तुम्ही साठ वर्षात काय केले? आम्ही फक्त 10 वर्षांचा हिशोब मागतोय तर यांची ही परिस्थिती आहे. टीव्हीवर जे दाखवले जाते ते फक्त दिसायला चांगलं आहे, खरी परिस्थिती तुम्ही आम्ही भोगतोय असे ते म्हणाले.

देश हुकुमशाहीने चालवण्याचा भाजपचा निर्धार, जनतेचा महाभयंकर उद्रेक होईल! – विजय वडेट्टीवार

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;