बाल्टीमोर पुल दुर्घटना : आठवडाभरापासून मालवाहू जहाजावर अडकलेय हिंदुस्थानी क्रू मेंबर्स
अमेरीकेतील बाल्टीमोर येथे मालवाहू जहाजाच्या धडकेने कोसळलेल्या फ्रान्सिस स्कॉट की पूल अपघाताला आठवडा होऊनही 20 हिंदुस्थानी क्रू मेंबर्स जहाजावर अडकले आहेत. क्रू मेंबर्स जहाजाची देखरेख करत आहेत. या जहाजावरील पूलाचा ढीगारा हटविण्यासाठी किती वेळ लागेल आणि हे क्रू मेंबर्स कधी मायदेशी परततील याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही.
दुर्घटनाग्रस्त जहाज हे बाल्टीमोरच्या बंदरात अडकलेले आहे. मात्र अद्याप ढीगारा बाजूला काढण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. अशामध्ये क्रू मेंबर्स नेमका कधी परतेल याची काही निश्चित नाही. अपघातग्रस्त मालवाहू जहाज 985 फूट लांब आहे. श्रीलंकेला जाणाऱ्या जहाजावर 4,700 कंटेनर भरलेले आहेत. गेल्या मंगळवारी पहाटेच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्याने जहाज पुलावर आदळले. त्यामुळे पुलाचा मोठा भाग कोसळला. तेथे बांधकामावर काम करणाऱ्या सात जणांचा मृत्यू झाला.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ताबडतोब क्रूने मदतीसाठी आपत्कालीन संदेश पाठवला. जहाज पुलाला धडकण्यापूर्वी त्या दिशेने जाणाऱ्या जहाजांना रोखण्यात पोलिसांना यश आले. त्या जहाजांना रोखण्यास उशीर झाला असता तर अनेकांना जीव गमवावा लागला असता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही जहाजावरील हिंदुस्थानी क्रू मेंबर्सचे प्रसंगावधान राखल्याने त्यांचे आभार मानले आहेत. शनिवारी अभियंत्यांच्या पथकांनी पुलावरून वाकलेल्या लोखंडाचा पहिला भाग कापून त्याचा ढिगारा काढण्याची कठिण अशी प्रक्रिया सुरू केली. पुलाच्या कोसळलेल्या उत्तरेकडील भागावर काम सुरू असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले. लोखंड कापण्यासाठी हेवी कटर मशीनचा वापर केला जात आहे. या पुलाचा ढिगारा हटविण्यासाठी 1 हजार टन वजनाला उचलण्यासाठी विशाल क्रेन मागविण्यात आली. शिवाय अन्य काही क्रेनही मागविण्यात आले होते. यामध्ये 10 टगबोट. 9 बरजे, आठ बचाव जहाज आणि 5 तटरक्षक जहाजंही युद्धपातळीवर तिथला ढिगारा हटविण्याचा प्रयत्न करत आहे. मेरीलॅण्डचे गव्हर्नर वेस मूर म्हणाले, हा ढीगारा हटविण्यासाठी आणि बंदर सुरु करण्यासाठी किती वेळ लागेल याचा निश्चित वेळ सांगता येणार नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List