महुआ मोइत्रांवर आरोप करणाऱ्या निशिकांत दुबेंनी मेडिकल कॉलेज बळकावलं, पत्नी व अन्य 9 जणांवर गुन्हा दाखल

महुआ मोइत्रांवर आरोप करणाऱ्या निशिकांत दुबेंनी मेडिकल कॉलेज बळकावलं, पत्नी व अन्य 9 जणांवर गुन्हा दाखल

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांच्यावर कॅश फॉर क्वेरीचा संसदेत आरोप करुन चर्चेत आलेले भाजपचे खासदार निशिकांत दुबे आता स्वत: अडचणीत आले आहेत. निशिकांत दुबे यांनी कागदपत्रांचा दुरुपयोग करत लिलावाच्या माध्यमातून एक खासगी मेडीकल कॉलेज बळकावल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि अन्य 9 जणांवर फसवणुकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे गोड्डा येथील खासदार निशिकांत दुबे यांनी देवघरमधील परित्रण मेडीकल कॉलेज आणि रुग्णालयाला कट रचून हडपल्याचा आरोप शिव दत्त शर्मा नावाच्या व्यक्तीने केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिवदत्त शर्मा यांनी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी 93 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, मात्र मेडीकल काऊन्सिल इंडिया द्वारा संस्थेसाठी मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांच्या कर्जाची रक्कम नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून घोषित करण्यात आली. त्यानंतर दुबे यांनी या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडून 20 लाख रुपये घेतले होते. मात्र त्यानंतरही लिलावाच्या माध्यमातून त्यांनी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात कॉलेज बळकावले. लिलावाच्या वेळी बाबा बैद्यनाथ मेडिकल ट्रस्टने बोली लावली.

देवघर मध्ये मेडिकल कॉलेज बळकावल्याचा आरोप भाजपचे गोड्डा येथील खासदार निशिकांत दुबे आणि त्यांच्या पत्नी अनामिका गौतम सहित 9 लोकांवर 406, 409, 420, 467, 468, 471, 120बी, 34 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र निशिकांत दुबे यांनी हे सर्व आरोप फेटाळत आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडणार असल्याचे सांगितले आहे, देवघर येथील जसीडीह ठाण्याचे प्रभारी रवि ठाकूर यांनी सांगितले की, शिव दत्त शर्मा नावाच्या व्यक्तीने भाजपचे खासदार आणि त्यांच्या पत्नीसह 9 लोकांविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या आधारावर पोलिसांनी प्राथमिक तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;