आज रत्नागिरी विधानसभा मतदार संघात बैठका, विनायक राऊत करणार मार्गदर्शन

आज रत्नागिरी विधानसभा मतदार संघात बैठका, विनायक राऊत करणार मार्गदर्शन

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे. उद्या मंगळवार दि.2 एप्रिल रोजी रत्नागिरी विधानसभा मतदार संघात जि.प. गटनिहाय बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकीत उमेदवार खासदार विनायक राऊत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी 29 मार्चपासून रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात आपला प्रचार सुरु केला आहे. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात बैठका घेऊन प्रचाराचा झंझावात सुरु केला. मंगळवारी 2 एप्रिल रोजी रत्नागिरी विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषद गट आणि रत्नागिरी शहराची बैठक होणार आहे. या सर्व बैठका खासदार विनायक राऊत यांच्या नाचणे अभ्युदयनगर येथील संपर्क कार्यालयात होणार आहेत.

उद्या मंगळवार दि.2 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता नाचणे जि. प. गट बैठक, अकरा वाजता हरचेरी जि. प. गट बैठक, दुपारी बारा वाजता मिरजोळे जि. प. गट बैठक, दुपारी एक वाजता शिरगाव जि. प. गट बैठक, दुपारी चार वाजता वाटद जि. प. गट बैठक, सायंकाळी पाच वाजता गोळप जि. प. गट बैठक, सायंकाळी सहा वाजता पावस जि. प. गट बैठक, सायंकाळी सात वाजता कोतवडे जि. प. गट बैठक, रात्री आठ वाजता हातखंबा जि. प. गट बैठक, रात्री नऊ वाजता शहर बैठक होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;