श्रीदेवीसोबतच्या नात्याविषयी समजताच आईने तिच्या हातात..; बोनी कपूर यांचा खुलासा

श्रीदेवीसोबतच्या नात्याविषयी समजताच आईने तिच्या हातात..; बोनी कपूर यांचा खुलासा

निर्माते बोनी कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिवंगत पत्नी आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्याविषयीचे काही किस्से सांगितले आहेत. बोनी कपूर यांच्या आईला जेव्हा दोघांच्या अफेअरविषयी समजलं, तेव्हा त्यांनी चक्क श्रीदेवी यांना राखी बांधायला सांगितली होती. इतकंच नव्हे तर लग्नापूर्वी श्रीदेवी या बोनी कपूर आणि त्यांच्या पहिल्या पत्नी मोना शौरी यांच्यासोबत एकाच घरात राहायच्या, असा खुलासा त्यांनी केला. श्रीदेवी यांनी 1996 मध्ये निर्माते बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना जान्हवी आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. श्रीदेवी यांच्यामुळे बोनी कपूर यांचा पहिला संसार मोडला, असेही आरोप अनेकांनी केले होते. बोनी कपूर आणि मोना यांना अर्जुन आणि अंशुला ही दोन मुलं आहेत. आईच्या निधनानंतर अर्जुनने बरीच वर्षे श्रीदेवी यांचा स्वीकार केला नव्हता.

‘झूम’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी सांगितलं की मोनाला या गोष्टीची माहिती होती की मी श्रीदेवीला पसंत करतोय. “मला स्वत:ला दोषी असल्यासारखं वाटतं. मात्र मी अर्जुनची आई मोनासोबत खूप प्रामाणिक होतो. तिला सुरुवातीपासूनच आमच्या नात्याबद्दल माहित होतं. किंबहुना लग्नाआधी श्रीदेवी आमच्यासोबत एकत्र राहत होती. माझ्या आईलाही आमच्या नात्याविषयी माहिती होती. याच कारणामुळे ती एकदा श्रीदेवीजवळ गेली आणि तिच्या हातात आरतीची थाळी दिली. आईने श्रीदेवीच्या हातात आरतीची थाळी देऊन मला राखी बांधायला सांगितलं होतं. त्यावेळी श्रीदेवीला समजतंच नव्हतं की त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे?”, असं त्यांनी सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Boney.kapoor (@boney.kapoor)

“श्रीदेवीसाठी माझ्या मनात नेहमीच प्रेम होतं. जवळपास पाच ते सहा वर्षांपर्यंत मी तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यासाठी मी अनेकदा माझ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. माझे हे प्रयत्न मोनालाही दिसत होते”, अशी कबुली बोनी कपूर यांनी या मुलाखतीत दिली.

24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचं दुबईतील हॉटेल रुममधील बाथटबमध्ये बुडून निधन झालं. गेल्या वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत बोनी कपूर हे श्रीदेवी यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले होते. श्रीदेवी यांना बऱ्याचदा मिठाशिवाय खूप कठीण डाएट फॉलो करावा लागायचा. त्यामुळे अनेकदा त्यांना चक्कर यायची, असा खुलासा त्यांनी केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;