Amitabh Bachchan यांच्या बंगल्याबाहेर मोठी गर्दी, बिग बींचं बाहेर पडणं कठीण, फोटो समोर

Amitabh Bachchan यांच्या बंगल्याबाहेर मोठी गर्दी, बिग बींचं बाहेर पडणं कठीण, फोटो समोर

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. अशात बिग बी देखील कधी चाहत्यांना नाराज करत नाहीत. आता देखील अमिताभ बच्चन यांनी काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये बिग बी यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी त्यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन प्रत्येक रविवारी जलसा बंगल्याबाहेरून चाहत्यांची भेट घेतात. आता देखील अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांसोबत खास भेटीचे फोटो एक्सवर पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांनी ‘जलसा द्वारा…’ अस कॅप्शन लिहिलं आहे.

 

 

अमिताभ बच्चन यांनी स्वतःचा आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत त्यांना कॅप्शनमध्ये ‘अपेक्षा… प्रेम… स्नेह…आणि सातत्याचा रविवार… जलसा द्वार येथील प्रेमाने पूर्व दृश्य… 1982 पासून आतापर्यंत, माझी कृतज्ञता आहे…’ असं म्हणाले आहेत.

 

 

सागायचं झालं तर, अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. बिग बी यांचे चाहते फक्त भारतात नाहीतर, परदेशात देखील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बिग बी चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. पण आतापर्यंत कोणताच नवीन अभिनेता अमिताभ बच्चन यांचं स्थान मिळवू शकलेला नाही.

आजही चाहते अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. लवकरच बिग बी यांचे अनेक सिनेमे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. ज्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमांबाबत चाहत्यांच्या मनातअ असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

अमिताभ बच्चन यांचे आगामी सिनेमे

वयाच्या 81 व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. आता बिग बी The Umesh Chronicles, कल्कि 2898 AD, बटरफ्लाय आणि Vettaiyan सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. चाहते बिग बी यांच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत आहेत.

सांगायचं झालंतर, काही दिवसांपूर्वी बिग बी ‘गणपत’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले होते. सिनेमात बिग बींसोबत टायगर श्रॉफ आणि कृती सनॉन यांनी देखील मुख्य भूमिका साकराली होती. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेट ठरला.. आता बिग बी यांचे सिनेमे बॉक्स ऑफिस काय कमाल दाखवतात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;