Loksabha Election 2024 : तृणमूलच्या उदयन गुहा यांच्या ताफ्यावर हल्ला, भाजपवर केला आरोप

Loksabha Election 2024 : तृणमूलच्या उदयन गुहा यांच्या ताफ्यावर हल्ला, भाजपवर केला आरोप

लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरु असताना पश्चिम बंगालमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. तृणमूल काँग्रेसचे मंत्री उदयन गुहा यांच्या ताफ्यावर काही गुंडांनी जीवघेणा हल्ला केला आहे. हल्ल्याचा आरोप भाजपच्य़ा मंत्र्यावर लावण्यात आला आहे.

पश्चिम बंगालच्या कूच बिहारमध्ये उदयन यांच्या ताफ्यावर 31 मार्च रोजी जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा हल्ला भाजपचे केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिक यांच्याकडून करण्यात आल्याचा आरोप लावण्यात आला आहे. उदयन यांनी आरोप केला आहे की, ”निवडणुक बिनविरोध जिंकण्यासाठी माझ्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. पण असे काही होऊ शकत नाही. मी लोकांना भेटत होतो त्याचवेळेत अचानक काही गुंड लाठी-काठ्या घेऊन आले आणि माझ्यावर हल्ला केला आणि माझ्या गाडीचे नुकसान केले”. तृणमूल नेत्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते., घटनास्थळी पोलीस पोहोचून त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;