Delhi liquor policy case – अरविंद केजरीवाल यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना राउज एव्हेन्यू कोर्टाने धक्का दिला आहे. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी कोर्टाने केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. कोर्टाने त्यांना 1 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आज ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. ईडीची ही मागणी कोर्टाने मंजूर केली आहे.
Excise policy case | Delhi’s Rouse Avenue court sends Delhi CM Arvind Kejriwal to judicial custody till April 15 pic.twitter.com/EQhviDECmF
— ANI (@ANI) April 1, 2024
अरविंद केजरीवाल तपासात सहकार्य करत नाहीत. ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ईडीने कोर्टात केला. तसेच त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. ही मागणी कोर्टाने मान्य केली. या सुनावणीवेळी केजरीवाल यांनी पत्नी सुनिता केजरीवाल यांच्यासह ‘आप’चे अनेक बडे नेते कोर्टामध्ये उपस्थित होत
दरम्यान, कोर्टामध्ये हजर होण्याआधी अरविंद केजरीवाल यांना माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काही करत आहेत ते देशासाठी चांगले नसल्याचा हल्लाबोल केजरीवाल यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List