कपिल शर्मासोबतच्या भांडणाला आजही विसरला नाही सुनील; पहिल्याच एपिसोडमध्ये मारला टोमणा

कपिल शर्मासोबतच्या भांडणाला आजही विसरला नाही सुनील; पहिल्याच एपिसोडमध्ये मारला टोमणा

कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ची सुरुवात झाली आहे. शनिवारी रात्री नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या शोचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला. नेहमीप्रमाणे कपिल शर्माने या शोचं सूत्रसंचालन केलं. मात्र यावेळी कपिलने चाहत्यांना मोठा सरप्राइज दिला. हा सरप्राइज होता सुनील ग्रोवर. बऱ्याच वर्षांनंतर सुनील कपिलच्या शोमध्ये परतला. सहा वर्षांपूर्वी कपिल आणि सुनील यांच्या विमानप्रवासादरम्यान भांडण झालं होतं. या भांडणानंतर सुनीलने कपिलचा शो सोडला होता. आता शोमध्ये परतल्यानंतर सुनीलने कपिलला भांडणावरून टोमणा मारला आहे.

30 मार्च रोजी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या पहिल्याच एपिसोडमध्ये अभिनेता रणबीर कपूर हा त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांच्यासोबत आला होता. या पहिल्या एपिसोडमध्ये सुनीलची एण्ट्री एका मोठ्या बॉक्समधून झाली. डफलीच्या भूमिकेत तिने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. मात्र यावेळी सुनीलने सहा वर्षांपूर्वीच्या भांडणाचाही उल्लेख केला.

सेटवर एका मोठ्या गिफ्ट बॉक्सला आणलं जातं. जेव्हा कपिल शर्मा हा गिफ्ट बॉक्स उघडतो, तेव्हा त्यातून सुनील ग्रोवर बाहेर येतो. सुनील बाहेर येताच प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट होतो. यानंतर दोघंही एकमेकांना जुन्या भांडणावरून उपरोधिक टिप्पणी करताना दिसतात. कपिल शर्मा म्हणतो, “मला असं का वाटतंय की मी या मूर्ख मुलीला आधीसुद्धा भेटलोय.” त्यावर सुनील त्याला उत्तर देतो, “मला पण असं वाटतंय की मी तुम्हाला एका फूड डिलिव्हरी ॲपसाठी फूड डिलिव्हरी करताना पाहिलंय.” त्यावर कपिल सुनीलला विचारतो की, “याचा अर्थ तू माझा चित्रपट झ्विगाटो पाहिलं आहेस?” त्यावर डफलीच्या भूमिकेतील सुनील नकारार्थी उत्तर देतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

कपिल आणि सुनीलचा संवाद ऐकून उपस्थित प्रेक्षक हसू लागतात. तेव्हा कपिल म्हणतो, “हेच भांडणाचं कारण ठरतं.” वादाचा उल्लेख करत सुनील पुढे म्हणतो, “असो, भांडणं तर होत राहतील. खरंतर काही लोक या भांडणांची मज्जा घेतात. बाहेर मला काहींनी असंही विचारलं की तुमच्या भांडणाचा दुसरा सिझन कधी पहायला मिळेल?”

शो सुरु होण्याआधी सुनीलला जेव्हा पत्रकारांनी कपिलसोबतच्या वादाविषयी प्रश्न विचारला, तेव्हा तो म्हणाला, “विमानात बसल्यानंतर आमच्या लक्षात आलं की येत्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मचा दबदबा खूप वाढणार आहे. त्यावेळी नेटफ्लिक्स भारतात नवीनच होतं. आम्हाला वाटलं की टेलिव्हिजनच्या प्रेक्षकाला जोडून ठेवण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागेल. म्हणूनच आम्ही पब्लिसिटी स्टंट म्हणून ते भांडण केलं होतं.” हे बोलताना सुनीलसह इतरांनाही हसू अनावर झालं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;