रणदीप हुडाचं 30 किलो वजन झालं कमी, डॉक्टर बहिणीचा कमाल, Weight Loss साठी सांगितला उत्तम पर्याय

रणदीप हुडाचं 30 किलो वजन झालं कमी, डॉक्टर बहिणीचा कमाल, Weight Loss साठी सांगितला उत्तम पर्याय

अभिनेता रणदीप हुडा सध्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar Movie ) सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर ऊर्फ वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमात अभिनेत्याने वीर सावरकर यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. वीर सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्याने स्वतःचं 30 किलो वजन कमी केलं. 30 किलो वजन कमी करण्यासाठी अभिनेत्रीने प्रचंड मेहनत घेतली आहे. ज्यासाठी अभिनेत्याच्या डॉक्टर बहिणीने त्याची मदत केली. रणदीप याच्या डॉक्टर बहिणीचं नाव अंजली हुडा सांगवान आहे. अंजली MD डॉक्टर आहेत. त्या लोकांना त्यांचं वजन कमी करण्यासाठी मदत करतात.

अंजली हुडा सांगवान म्हणाल्या, ‘रणदीप याला सरबजीत सिनेमात वजन कमी करण्यासाठी पद्धत सांगितली होती आणि वीर सावरकर सिनेमात त्याला ती पद्धत फायदेशीर ठरली.‘ अंजली हुडा सांगवान सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्या इतरांना वजन कमी करण्यासाठी टिप्स देखील देत असतात.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

 

सोशल मीडियावर अंजली हुडा सांगवान एक व्हिडीओ पोस्ट करत म्हणाल्या होत्या, ‘जर कोणी फार लवकर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर, अशा व्यक्तींना किडनी स्टोन, गॉल ब्लॅडर यांसारखे आजार होत असतात… डिहायड्रेशनमुळे देखील अनेक समस्या डोकं वर काढतात.’

क्रॅश डायटिंगपासून स्वतःचा बचाव केला पाहिजे. रणदीप याने वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांची मदत घेतली. एक्सपर्ट लोकांच्या मदतीने आणि योग्य आहार घेऊन त्याने स्वतःचं वजन कमी केलं आहे. वर्कआऊट, आहार सर्व गोष्टी लक्षात घेत अभिनेत्याचं वजन कमी करण्यासाठी अनेकांनी मदत केली आहे.

‘वजन कमी करण्यासाठी जेवण न करणं ही सर्वात मोठी चूक आहे. तर योग्य आहाराची गरज शरीराला असतेच.’ असं देखील अभिनेत्याच्या बहिणीने सांगितलं आहे. सिनेमासाठी वजन कमी केल्यानंतर अभिनेत्याने स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाला होता.

सिनेमामुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये तुफान वाढ झाली. सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करताना देखील दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमात अभिनेत्री अंकिता लोखंड देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;