पनवेल, शहापूरमध्ये दोन अपघातांत चार तरुण ठार; पाचजण जखमी
शहापुरात आणि पनवेलमध्ये झालेल्या दोन भीषण अपघातांत चार तरुण ठार झाले असून पाचजण जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. हे अपघात इतके भयंकर होते की यात दोन्ही कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातवारने मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावरील आटगावजवळील एका मोरीच्या कठड्याला कारने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. शहापूरमध्ये राहणारे मयुरेश चौधरी, जयेश शेंडे व हर्षल जाधव हे तिघे तरुण पेंढरघोळ येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. हळदीचा कार्यक्रम आटपून वॅगनर कारने तिघे शहापूरच्या दिशेने येत असताना संघवी कॉम्प्लेक्सच्या पुढे असलेल्या एका मोरीच्या कठड्याला त्यांच्या कारने जोरदार ठोकर दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मयुरेश चौधरी, जयेश शेंडे या दोघांना मृत घोषित केले.
स्नूकर बॉल खेळण्यापूर्वीच मृत्यू
दुसऱ्या अपघातात सीवूड्स दारावे येथील सहा मित्र स्नूकर बॉल खेळण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र स्नूकर बॉल खेळण्याचे ठिकाण बंद होते. त्यामुळे त्यांनी रॉयल ओक या हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर त्यांनी महामार्गावर फेरफेटका मारण्याचे ठरवले. जेएनपीए-पनवेल महामार्गावरील भंगारपाडा येथील पंकज पार्किंगसमोर आले असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार समोरील कंटेनरवर जाऊन आदळली. यामध्ये हितेंद्र पाटील आणि श्रीनाथ चंद्रशेखर या दोघांचा मृत्यू झाला. तर चारजण किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी कारचालक हर्ष पाटील याच्यावर पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List