इच्छुक उमेदवारांमुळे 10 लाखांची करवसुली

इच्छुक उमेदवारांमुळे 10 लाखांची करवसुली

राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून, ही निवडणूक पालिकेच्या प्रशासनासाठी मात्र आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांना थकबाकी भरणे बंधनकारक असल्याने अल्पावधीतच पालिकेच्या तिजोरीत 10 लाख 36 हजार 831 रुपयांची भर पडली आहे.

राजापूरसारख्या ‘क’ वर्ग नगरपालिकेला शासनाकडून मिळणारा निधी आणि तुटपुंजे उत्पन्न यामुळे शहराचे रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधांचा डोलारा सांभाळताना कसरत करावी लागते. त्यामुळे शहराच्या विकासासाठी नागरिकांकडून मिळणारा कर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. यंदाच्या निवडणुकीने कर वसुलीचे काम प्रशासनासाठी अत्यंत सोपे केले आहे.

निवडणूक कालावधीत झालेल्या या विक्रमी वसुलीची आकडेवारी पाहता, घरपट्टीच्या माध्यमातून सर्वाधिक म्हणजेच 7 लाख 61 हजार 781 रुपये पालिकेच्या खात्यात जमा झाले आहेत. त्याखालोखाल पाणीपट्टीच्या स्वरूपात 2 लाख 75 हजार 050 रुपयांची वसुली झाली आहे. अशा प्रकारे घरपट्टी आणि पाणीपट्टी मिळून एकूण 10 लाख 36 हजार 831 रुपये जमा झाले आहेत.

थकबाकी भरण्याला प्राधान्य

निवडणुकीच्या रिंगणात उतरू इच्छिणाऱ्या उमेदवाराला तो पालिकेचा थकबाकीदार नसल्याचे सिद्ध करावे लागते. उमेदवाराच्या अर्जावर स्वाक्षरी करणाऱ्या सूचकांकडेही पालिकेची कोणतीही थकबाकी असता कामा नये, अशी अट आहे. त्यामुळे आपला अर्ज बाद होऊ नये या भीतीपोटी इच्छुकांनी स्वतःसह आपल्या सूचकांचीही थकबाकी तातडीने भरण्याला प्राधान्य दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘वीरूची एक्झिट’.. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ‘वीरूची एक्झिट’.. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे. बाॅलीवूडमध्ये त्यांना हिमॅन या नावाने ओळखले जात असे. धर्मेंद्र...
तमिळनाडूमध्ये दोन बसचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू
व्हिटॅमिन सीचे भांडार आहे हे फळ, त्वचा आणि केसांसाठी सुद्धा लाभदायक, जाणून घ्या
IND Vs SA 2nd Test Match – यशस्वी जयस्वालची ऐतिहासिक कामगिरी; WTC मध्ये असं करणारा हिंदुस्थानचा पहिलाच फलंदाज
दिल्लीत इंडिया गेटसमोर नक्षल कमांडर हिडमाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; पोलिसांवर ‘चिली स्प्रे’ने हल्ला, 23 जणांना अटक
काबूलहून येणारे विमान चुकून टेक-ऑफ रनवेवर उतरले, दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
तीस देशांच्या दुतावासांतील शिष्टमंडळाला अजिंठा लेणीची भुरळ!