मुंबईच्या सुशोभीकरणाचा बोजवारा

मुंबईच्या सुशोभीकरणाचा बोजवारा

 

मुंबई महानगरपालिकेने मिंधे सरकारच्या आदेशानंतर मोठा गाजावाजा करत मुंबईत सुशोभीकरणाची मोहीम राबवली. या प्रकल्पाअंतर्गत मोकळय़ा जागांची निर्मिती, वाहतूक बेटे, उद्याने, पदपथ, विद्युत स्तंभ, सार्वजनिक भिंतींची रंगरंगोटी यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले. त्याचबरोबर त्यासाठी केलेल्या जाहिरातींवरही 118 कोटी रुपये खर्च केले. मात्र मुंबईतील विविध भागांत मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱया आणि त्यातून विविध समाजोपयोगी संदेश देणाऱया प्रतिकृतींची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. नाना चौक येथे कारंजा बंद पडला आहे. तर ‘डी’ विभागाच्या प्रवेशद्वारासमोरील शांततेचे प्रतीक असलेल्या कबुतरांच्या शिल्पाचीही वाताहत झाली आहे. वरळीच्या काही चौकांतही अशीच स्थिती आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;