गडचिरोलीत नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला

गडचिरोलीत नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला

 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिह्यात घातपात घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला. एटापल्ली आणि धानोरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगड सीमेलगतच्या टेकडीवरील नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. पेंढरीपासून 12 किलोमीटर अंतरावर पूर्वेला छत्तीसगडच्या मानपूर जिह्यातील चुटीनटोला गावाजवळ 450 मीटर उंच पहाडी भागात नक्षलवादी तळ ठोकून असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नलोत्पल यांनी 30 मार्च रोजी नक्षलविरोधी अभियान राबवले. अपर अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सी-60 जवानांच्या पथकाने पहाडी पार करून नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. पोलिसांनी कार्डेक्स वायर, डिटोनेटर, जिलेटिन स्टिक्स, बॅटरी, वॉकी टॉकी चार्जर, बॅकपॅक असा शस्त्रसाठा आणि साहित्य जप्त केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;