आनंदाच्या शिध्यात देणार व्हिस्की आणि बीअर, चंद्रपूरमधील महिला उमेदवाराचे मतदारांना आश्वासन
निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांकडून जाहीरनाम्याद्वारे मतदारांना वेगवेगळी आश्वासने दिली जातात. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराने तर आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बीअर देण्याचे आश्वासन मतदारांना दिले आहे. विशेष म्हणजे या उमेदवार महिला वर्गातील आहेत.
चंद्रपूरमध्ये भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार तर काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर हे उमेदवार आहेत. त्याच मतदारसंघात अखिल भारतीय मानवता पक्षाच्या वतीने वनिता राऊत या निवडणूक लढवत आहेत. महागडी व्हिस्की आणि बिअर पिण्याचा अधिकार फक्त श्रीमंतांनाच आहे का, असे म्हणत त्यांनी आपण निवडून आल्यास आनंदाच्या शिध्याबरोबर व्हिस्की आणि बिअर देऊ असे त्यांनी मतदारांना सांगितले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List