‘+92…’ नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल येतोय… सावधान!

‘+92…’ नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल येतोय… सावधान!

 

अनोळखी मोबाईल नंबरवरून येणारे कॉल्स मोठय़ा अडचणीत टाकू शकतात. मार्पेटिंग कंपन्यांकडून येणारे अशा प्रकारचे कॉल्स ही नित्याची डोकेदुखी. आता त्यात आणखी भर पडलीय ती आंतरराष्ट्रीय फोन कॉल्सची. गेल्या काही दिवसांत अनेकांना ‘+92…’ नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला आणि आपण केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयातून बोलत असल्याचे सांगण्यात आले, मात्र हे कॉल्स आम्ही केलेले नाहीत. हे कॉल्स उचलू नका, असा सावधानतेचा इशारा दूरसंचार मंत्रालयाने दिला आहे.

सरकारी विभागाकडून आलेल्या कॉलवर लोक विश्वास ठेवतात व गोपनीय माहितीही शेअर करतात. याच कल्पनेने सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीची नवीन ‘मोड्स ऑपरेंडी’ अवलंबली आहे. अमुक अमुक तपशील द्या, अन्यथा तुमचा मोबाईल क्रमांक कायमचा बंद होईल अशा प्रकारची धमकी दिली जात आहे.

लोक भीतीपोटी लगेच माहिती देताहेत. प्रत्यक्षात हे कॉल्स पाकिस्तानसारख्या अन्य देशांतून येत आहेत. त्यामुळे कॉल्स उचलून गुप्त माहिती शेअर करण्याची जोखीम पत्करू नका, अशी सूचना दूरसंचार मंत्रालयाने केली आहे.

दूरसंचार मंत्रालयाचा अलर्ट

अज्ञात व्यक्ती दूरसंचार मंत्रालयाचे नाव सांगेल आणि तुम्ही बेकायदेशीर कृत्य केल्याचे सांगून मोबाईल क्रमांक बंद करण्याची धमकी देईल. कॉल करणाऱया व्यक्तीचा दूरसंचार मंत्रालयाशी काहीही संबंध नाही. आम्ही कोणत्याही व्यक्तीला असा कॉल करीत नाही किंवा व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवत नाही.

कॉल करणारा व्यक्ती वैयक्तिक माहिती मागवून फसवणूक करीत आहे. तुमचीही फसवणूक झाली असेल, तर 1930 क्रमांकावर कॉल करून किंवा  www.cybercryme.gov.in तक्रार नोंदवा.

 

ही खबरदारी घ्या!

तुमची वैयक्तिक माहिती, एटीएमचा पिन तसेच बँक खात्याशी संलग्न असलेला मोबाईल नंबर कुठेही शेअर करू नका.

काही महिन्यांनी एटीएम, जी मेल, फेसबुक, इन्स्टाग्रामचे पासवर्ड बदलत राहा.

आपल्याला पैसे पाठवत असल्याचे सांगून कुणी तुमच्या बँक खात्याचा नंबर वा एटीएम पिन वा ओटीपी मागू शकतो. ही माहिती देणे टाळा.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;