निवडणूक म्हणजे ‘गेम सेट मॅच’ केली आहे…तर इलेक्शनऐवजी सिलेक्शन करा; आदित्य ठाकरेंकडून प्रारुप यादीतील गोंधळाची पोलखोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनाभवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगातील गोंधळ आणि मतचोरीबाबत जनतेला माहिती दिली. मतदार यादीतील गोंधळ आणि इतर घोळ पाहता ही निवडणूक म्हणजे ‘गेम सेट मॅच’ केली आहे…तर इलेक्शनऐवजी सिलेक्शन करा, असा हल्लाबोलही त्यांनी केला. तसेच या यादीतील गोंधळ आपण लवकरच जनतेसमोर आणणार आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
मतदार यादीत काही दुबार, तिबार मतदार, काही बोगस मतदार आहेत. तर काही ठिकाणी 10 बाय 10 च्या खोलीत 40-50 मतदार आहेत. एका दुकानावर मतदार नोंदवले होते. हा सगळ्या घोळ आपण जनतेसमोर आणला. सगळेच विरोधी पक्ष या घोळाबाबत बोलत आले आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरयाणामध्ये कशाप्रकारे घोळ झाला, ते जनतसमोर आणले. बिहारमध्येही जेवढे मतदार आहेत, त्यापेक्षा जास्त मतदान झाले आहे. काही दिवसात तेथील घोळही उघड होईल. वोटचोरी करून त्यांनी सत्ता स्थापन केली आहे, असे ते म्हणाले.
आता सर्व महानिगरपालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 ची यादी त्यांनी ग्राह्य धरली आहे. त्याविरोधात आपण मोर्चाही काढला होता. त्यामुळे या काळातील 18 वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही. या यादीतील गोंधळ येत्या आठवड्यात आम्ही जनतेसमोर आणू. तसेच प्रारुप यादी 7 नोव्हेंबरला येणार होती, त्याची तारखी पुढे ढकलून ती 20 नोव्हेंबरला आली आहे. ते नेमके कशासाठी थांबले होते? असा प्रश्न पडला होता. आता ती यादी आली आहे. ती मशीन रीडेबल नाही. तसेच मतदाराबाबत खूप माहिती मागितली आहे. तसेच त्यातही अनेक गोंधळ घालण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयात बसून कामकाज करत आहे, असे आता दिसून येत आहे. त्यांना वॉर्ड बनवणे, वॉर्डच्या सीमारेषा आखणे जमले नाही, त्यांनी यादीच्या यादी उचलून दुसऱ्या यादीत टाकली आहे. त्यामुळे 29 महापालिकांमधील नागरिकांनी मतदारयादीत त्यांचे नाव आहे किवा नाही, तसेच त्यांच्या पत्त्यावर इतर मतदार नोंदले गेले आहेत का, याची माहिती घ्यावी. ही यादी अत्यंत किचकट आहे. तुमची इमारत, तुमचे नाव यादीत आहेत की नाही, तेच कळत नाही. या सर्व गोष्टींचा अभ्यास सुरू आहे. ही यादी पाहूनच धक्का बसतो, असे ते म्हणाले.
अशा प्रकारे निवडणूक गेम सेट मॅच केली आहे. असे असेल तर निवडणुका घेण्याची गरजच काय आहे. जनतेला मतदानाला कशाला बोलावता, तुमच्या कार्यकर्त्यांचेच मतदान घ्या, आणि इलेक्शनऐवजी सिलेक्शन करा, असेही ते म्हणाले. अशा मतदारायादीतून ते वोटचोरी करत आहे. मुंबई, पुणे यासारख्या महापालिका जिंकण्यासाठी आमची शहरे लुटण्यासाठी त्यांचे काम सुरू आहे. याविरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. मात्र, याबाबत तक्रारी दिल्यानंतरही भाजपचे सरकार नाही, तर निवडणूक आयोग काही कारवाई करणार आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. पक्षाचे सचिव सूरज चव्हाण यांनी मतदार यादीतील अनेक गोंधळ यावेळी उघड केले.
मतदार म्हणून आपले नाव यादीत असते. मात्र, मिंधे आणि भाजप यांनी एका बूथमधील अनेक मतदार दुसऱ्या बुथमध्ये हलवले आहेत. विरोधी पक्षांचे उमेदरवार पडतील, आपले उमेदवार जिंकून येतील, अशा प्रकारे प्रारुप याद्या बवनण्यात आल्या आहेत. त्यासाठी या याद्या येण्यासाठी वेळ लागला, असे त्यांनी सांगितले. जर अधिकाऱ्यांना काम जमत नसेल, तर त्यांना घरी बसवणे गरजेचे आहे. तसेच जाणूनबुजून असे केले असेल तर जनतेचा मतदानाचा हक्क हिसकावणाऱ्यांविरोधात देशद्राहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List