चिपळूणात 28 जागांसाठी 110 उमेदवार रिंगणात; नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार
चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शुक्रवारी 12 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर नगरसेवक पदाच्या २८ जागांसाठी तब्बल ११० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता चिपळूण नगपरिषदेची निवडणूक बहुरंगी होणार आहे.
चिपळूण नगरपालिकेची निवडणूक कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार, शिंदेशिवसेना, ठाकरेसेना, भाजपा आणि समाजवादी पार्टी अशा सात पक्षांमध्ये होणार आहे. यामध्ये १९ उमेदवार अपक्ष निवडणूक लढणार आहेत. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राजू देवळेकर, महायुतीकडून उमेश सकपाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाकडून रमेश कदम, कॉंग्रेसकडून सुधीर शिंदे, समाजवादी पार्टीचे मोइन पेचकर तर अपक्ष निशीकांत भोजने व लियाकत शहा असे ७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये यापूर्वी नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मिलींद कापडी यांनी माघार घेतली. तर नगरसेवकपदासाठी प्रभाग १ अ मधील इशरद गोठे, १ ब मधील श्रीराम शिंदे, रिजवान सुर्वे, नईम खाटीक, प्रभाग ५ अ मधील सुनिल खेडेकर, ५ ब मधील सिमा रानडे, भक्ती कुबडे, ८ अ मधील मृणाल घटे, ११ ब मधील महेंद्र सावंत अशा ९ जणांनी शुक्रवारी शेवटच्या दिवशी माघार घेतली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List