दारूसाठी पतीने मित्रांसोबत केला पत्नीचा सौदा, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी
उत्तर प्रदेशमधील लखनौ शहरात एका पतीने दारूसाठी त्याच्या पत्नीला मिंत्रासोबत शैय्यासोबत करायला भाग पाडले. त्याने आपल्या पत्नीचा सौदा करून पैसे कमावले. त्याने तिला कोल्ड्रिंकमधून नशेची गोळी देऊन बेशुद्ध केले व तिला मित्रांच्या ताब्यात देऊन तो निघून गेला होता. या प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली असून मुख्यमंत्री कार्यालयाकडे देखील याची तक्रार दाखल केली आहे.
वझीरगंजचे इन्स्पेक्टर राजेश कुमार त्रिपाठी यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, ”पीडित महिला ही वझीरगंजची रहिवासी आहे. तिचा निकाह 14 ऑक्टोबर 2022 रोजी निकाह झाला होता. हरदोई येथील एका व्यापाऱ्याशी तिचा निकाह झालेला”, असे सांगितले.
पीडित महिलेच्या पतीला दारूचे व्यसन असल्याने त्या दोघांमध्ये त्यावरून अनेकदा वाद व्हायचे. पती तिला मारहाण देखील करायचा. त्यानंतर त्याने अनेकदा पत्नीला कोल्डड्रिंकमधून नशेची गोळी देऊन तिला मित्रांच्या स्वाधीन केले. यातून ती गर्भवती देखील राहिली होती. त्याने तिचा गर्भपात देखील केला होता. पतीच्या त्रासाला कंटाळून ती रुग्णालायतूनच माहेरी पळून गेली होती.
त्यानंतर पतीने दारूसाठी त्यांचे राहते घर विकले व तो भाड्याच्या घरात राहू लागला. त्याने पत्नीला फोन करून पुन्हा स्वत:सोबत राहायला बोलावले. मात्र तिने विरोध करताच त्याने तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे वैतागलेल्या महिलेने पती विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List