Bangladesh Earthquake : बांगलादेशात भूकंप, 6 जणांचा मृत्यू; 200 जण जखमी
बांगलादेशात शुक्रवारी सकाळी भूकंपाचे झटके बसले. या भूकंपात सहा जणांचा मृत्यू झाला असून 200 जण जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता 5.7 रिश्टर स्केल इतकी नोंद नोंदवली गेली. ढाकापासून 25 किमी अंतरावर नरसिंगडी जिल्ह्यातील घोराशाल येथे भूकंपाचे केंद्र होते. भूकंपानंतर बांगलादेशात सुरू असलेला बांगलादेश-आयर्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनाही थांबवण्यात आला आहे.
भूकंपामुळे इमारतीची भिंत आणि छताचा काही भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. तर पुलाची रेलिंग तुटल्याने तीन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. याशिवाय विविध ठिकाणी सुमारे 200 जण जखमी झाले. भूकंपामुळे संपूर्ण शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार, सकाळी 10.38 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या खोली 10 किलोमीटर होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List