बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची उद्धव ठाकरे यांच्याकडून पाहणी
छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले आहेत की, “मधल्या काळात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट अस्तित्वात नव्हता. त्यानंतर आता पुन्हा नव्याने ते अस्तित्वात आले आहे. नवीन नेमणूक परत झालेल्या आहेत. जवळपास आठ-नऊ महिन्यानंतर आपण कुठे आहोत, हे पाहायला मी येथे आलो होतो. लवकरच आता ट्रस्टची मिटिंग होईल आणि पुढील काम सुरू होईल.”
उद्धव ठाकरे म्हणाले की, “गेले आठ-नऊ महिने स्मारकाचं काम बंद होतं. आता ते पुन्हा सुरू होईल. या २३ जानेवारीला हे काम पूर्ण होणं, केवळ अशक्य आहे. मात्र एक नक्की त्याच्या पुढील वर्षी स्मारकाचे काम नक्की पूर्ण होईल. २०२७ साली हे स्मारक जनतेसाठी खुले होईल.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List