Shaitaan सिनेमाला कोणत्या गोष्टीचा होतोय फायदा? चौथ्या आठवड्यातही सिनेमाची तगडी कमाई

Shaitaan सिनेमाला कोणत्या गोष्टीचा होतोय फायदा? चौथ्या आठवड्यातही सिनेमाची तगडी कमाई

Shaitaan Day 25 Box Office Collection | अभिनेता अजय देवगन आणि अभिनेता आर माधवन स्टाररर ‘शैतान’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘शैतान’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. फार कमी सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात आणि त्याचा होणार फायदा बॉक्स ऑफिसवर दिसून येतो. फत्त 65 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने 130 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गल्ला पार केला आहे. कमी बजेट आणि मोजक्याच सेलिब्रिटींमध्ये साकारण्यात आलेला ‘शैतान’ सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंज करण्यात यशस्वी ठरला आहे.

सांगायचं झालं तर ‘शैतान’ सिनेमाने सिद्ध करून दाखवलं आहे की, कलाकारांचं अभिनय, दिग्दर्शन आणि सिनेमाची कथा सर्वात जास्त महत्त्वाची असते, चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यासाठी.. दिग्दर्शन, कलाकार आणि सिनेमाची कथा उत्तम असेल तर कमी बजेट असलेला सिनेमा दोखील कोट्यवधींच्या कमाईसाठी लाभदायक ठरतो..

‘शैतान’ सिनेमाची कमाई

‘शैतान’ सिनेमाबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायंची झाली तर, सध्या 2 आठवडे एखादा सिनेमा चित्रपटगृत टिकणं कठीण झालं आहे. अशात ‘शैतान’ सिनेमाची तिसऱ्या आठवड्यात देखील यशाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. तिसऱ्या आठवड्यात सिनेमाने 20 कोटी रुपयांची कमाई केली.

चौथ्या आठवड्याबद्दल सांगायचं झालं तर, शुक्रवारी सिनेमाने 1.25 कोटी रुपयांची कमाई केली तर, शनिवारी – रविवारी सिनेमा 1-60 कोटी आणि 1.90 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे. प्रदर्शनापासून आतापर्यंत सिनेमाने 138 कोटी 90 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे येत्या दिवसांत ‘शैतान’ सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

‘शैतान’ सिनेमाला का होतोय फायदा?

सिनेमाला सर्वात जास्त फायदा स्टारकास्टने केलेल्या प्रमोशनमुळे नाही तर, माऊथ पब्लिसीटीमुळे झाला आहे. सिनेमाची कथा भन्नाट आहे, ज्यामुळे प्रेक्षक सिनेमाला पसंती दर्शवत आहेत. ‘शैतान’ सोबतच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर ‘योद्धा’ आणि ‘क्रू’ सिनेमा देखील प्रदर्शित झाला. पण तरी देखील ‘शैतान’ सिनेमाला मोठा फायदा होताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘शैतान’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;