आलियाच्या बहिणींना रणबीरने ‘जूता चुराई’साठी दिले होते 11 कोटी रुपये? कपिल शर्माच्या शोवर खुलासा

आलियाच्या बहिणींना रणबीरने ‘जूता चुराई’साठी दिले होते 11 कोटी रुपये? कपिल शर्माच्या शोवर खुलासा

लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा त्याचा नवीन शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 30 मार्चपासून नेटफ्लिक्सवर त्याचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ स्ट्रीम होत आहे. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये रणबीर कपूरने त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनीसोबत हजेरी लावली. यावेळी सुनील ग्रोवर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा यांनी त्यांच्या विनोदबुद्धीने आणि अभिनयाने सर्वांना खळखळून हसवलं. या एपिसोडमध्ये रणबीर, नीतू आणि रिद्धिमा यांनी त्यांच्या कुटुंबीयांविषयीच्या बऱ्याच गोष्टी मोकळेपणे सांगितल्या. रणबीरला यावेळी त्याच्या लग्नाविषयीचा एक किस्सासुद्धा विचारला गेला. त्याने आलिया भट्टच्या बहिणींना ‘जुता चुराई’नंतर किती रुपये दिले होते, असा प्रश्न कपिलने विचारला होता.

रणबीरने मोजके कुटुंबीय आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत त्याच्या घरी आलिया भट्टशी लग्न केलं होतं. त्यावेळी लग्नादरम्यान अशी चर्चा होती की रणबीरने आलियाच्या बहिणींना चप्पल लपवण्याच्या विधीसाठी 11 कोटी रुपये दिले होते. आता कपिल शर्माने रणबीरने याविषयी प्रश्न विचारला. “तू खरंच आलियाच्या बहिणींना 11-12 कोटी रुपये दिले होते का”, असं तो विचारतो. त्यावर उत्तर देताना रणबीर म्हणतो, “नाही, हे खरं नाही.” नंतर नीतू कपूर सांगतात की रणबीरने त्यांना काही रोख रक्कम दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

रणबीर पुढे म्हणतो, “आलियाच्या बहिणींनी माझ्याकडून काही लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र ते कमी करून मी त्यांना काही हजार रुपयांपर्यंतची कॅश दिली होती.” हे ऐकताच परीक्षकाच्या खुर्चीवर बसलेली अर्चना पुरण सिंह थक्क होते. “हजारांमध्ये? इतकं कमी?”, असं ती रणबीरला विचारते. तेव्हा रणबीर सांगतो, “हो, आमचं लग्न घरीच झालं होतं. त्यामुळे चप्पल लपवली असती तरी ती घरातच असती.” हे ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.

यावेळी कपिलसुद्धा त्याच्या लग्नातील किस्सा सांगतो. “माझ्या मेहुणींनी लपवलेली चप्पल परत देण्यासाठी 11 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावर मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही चप्पल आणि तुमची बहीणसुद्धा तुमच्याकडेच ठेवा. मला माहित होतं की गिन्नी माझ्यावर खूप प्रेम करते. त्यामुळे ती स्वत:हून माझ्याकडे आली असती. राहता राहिली गोष्ट चपलांची, तर ते मी नवीन विकत घेतले असते”, असं कपिल म्हणतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;