शिपायाने केला विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार
कांदिवली पूर्व येथे चार वर्षांच्या मुलीवर सुरक्षा रक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच सांताक्रूझ येथील एका शाळेतील शिपायाने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शिपाईविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.
सांताक्रूझ पश्चिम परिसरात एक शाळा आहे. त्या शाळेत ती पीडित मुलगी तिसरीत शिकत होती. गेल्या डिसेंबर ते मार्च या काळात तो शिपाई त्या मुलीला शाळेतील एका रूममध्ये नेत असायचा. त्या रूममध्ये नेऊन तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. आरोपी हा मुलीला धमकावतदेखील असायचा. पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. घडल्याप्रकरणी मुलीच्या आईने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सांताक्रूझ पोलिसांनी शिपाईविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी त्या शिपाईला अटक केली. त्या शिपाईने अन्य मुलींसोबत असा प्रकार केला आहे का? याचा तपास सांताक्रूझ पोलीस करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List