कचाथीवू बेटाचे बोलता, मग तुम्ही दहा वर्षांत काय केलेत? खरगे यांची सडेतोड टीका
इंदिरा गांधींनी श्रीलंकेला कचाथीवू बेट देऊन टाकल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपाला काँग्रेसने सडेतोड उत्तर दिले असून, निवडणुकीपूर्वी हा मुद्दा समोर आणून सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न मोदींची हतबलता दर्शवत असल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. मोदींच्या सत्ताकाळात हे बेट परत मिळवण्यासाठी पावले का उचलली नाहीत, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
लडाखमधील गलवान खोऱ्यात आपल्या 20 सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिल्यानंतरही पंतप्रधानांनी चीनला ‘क्लीन चिट’ का दिली, असा सवालही खरगे यांनी एक्सवर केला आहे.
काय आहे कचाथीवू प्रकरण…
1974 मध्ये उभय देशांतील मैत्रीपूर्ण कराराचा एक भाग म्हणून कचाथीवू बेट श्रीलंकेला देण्यात आले होते. तशी त्याची नोंदही आहे. सत्तेवर आल्यापासून आजपर्यंत या बेटाविषयी काहीही न बोलणाऱ्या, करणाऱ्या मोदी आणि भाजपला अचानक या बेटाची आठवण झाली आहे. आणि मोदी सरकारनेही सीमावर्ती गावांच्या देवाणघेवाणीसाठी बांगलादेशशी असाच ‘मैत्रीपूर्ण करार’ केला होता याची खरगे यांनी आठवण करून दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List