अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्टेटस, व्हॉट्सऍप ग्रुप सोडले; निवडणूक आचारसंहिता भंग आणि कारवाईची धास्ती

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्टेटस, व्हॉट्सऍप ग्रुप सोडले; निवडणूक आचारसंहिता भंग आणि कारवाईची धास्ती

निवडणूक काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्याशी संबंधित व्हॉट्सअॅप चॅटिंग किंवा स्टेटस किंवा प्रचारावर निवडणूक आयोगाने वॉच ठेवण्याचे धोरण कडक केले आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नांदेड जिल्हा परिषदेच्या एका कर्मचाऱ्याला थेट निलंबित करण्यात आल्याने सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हादरले आहेत. अनेकांनी राजकीय नेते, आमदार, खासदारांच्या कार्यकर्त्यांचे ग्रुप सोडले. स्टेटस ठेवणे बंद केले.

सरकारी नोकरीत असले तरी बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी यांना राजकारणाची मोठी गोडी आहे. अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे काही विशिष्ट नेते, आमदार, खासदार यांचे खास म्हणून वावरत असतात. राजकारणावर चर्चा करतात किंबहुना सोशल मीडियावरदेखील व्यक्त होतात. अनेक कर्मचारी, शिक्षक यांनी तर थेट प्रचार सभांमध्ये भाषणे ठोकून उमेदवाराचा प्रचार केल्याची उदाहरणे आहेत. काही जण तर उमेदवार आणि राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसून निवडणुकीचे प्रत्यक्ष कामदेखील करत असल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आले होते.

व्हॉट्सअॅपद्वारे निवडणुकीच्या प्रचाराबाबतचा संदेश देऊन या कर्मचाऱ्याने आचारसंहितेच्या नियमाचे उल्लंघन केल्याने नांदेड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 मधील कलम 3 व 4 कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईचा परिणाम पुणे जिह्यातील सरकारी यंत्रणा अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर झाला आहे.

मोबाईल बंद कर

अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे निवडणुका आणि राजकारणावर गप्पांचे फड रंगविण्यात माहीर आहेत. किंबहुना राजकीय कार्यकर्त्यांना कार्यालयातील खुर्चीत बसून सल्लेदेखील देतात. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून सरकारी कार्यालयांमधील राजकीय चर्चा थांबल्या आहेत. सोशल मीडियावर व्यक्त होण्यापासूनदेखील अनेक जण अलिप्त झालेत. काही जणांनी तर राजकीय पक्ष किंवा कार्यकर्त्यांशी संबंधित व्हॉट्सअप ग्रुपमधून निवडणूक काळापुरते बाजूला होण्याची भूमिका घेतली आहे. ओघाने चर्चा आली तर मोबाईल बंद कर म्हणून समोरच्यांना सूचना केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;