निवडणुकीचे पडघम वाजले, एलपीजीचे दर कमी झाले; गॅस सिलिंडर तब्बल 30.50 रुपयांनी स्वस्त

निवडणुकीचे पडघम वाजले, एलपीजीचे दर कमी झाले; गॅस सिलिंडर तब्बल 30.50 रुपयांनी स्वस्त

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून पहिल्या टप्प्यात देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वीच एलपीजीच्या किंमतींमध्ये कपात करण्यात आली आहे. आजपासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 19 किलो वजनाचा व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल 30.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

तेल विपणन कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती जाहीर करतात. त्यानुसार आज 1 एप्रिल रोजी तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या आणि फ्री ट्रेड एलपीजीच्या (एफटीएल) दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. व्यावसायिक गॅस सिलिंडर 30.50 रुपये ते 32 रुपये, तर एफटीएल सिलिंडर 7.50 रुपये स्वस्त झाला आहे.

प्रमुख शहरांतील किंमती

नवीन दरांनुसार, मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 31.50 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये आता व्यावसायिक गॅस सिलिंडर 1717.50 रुपयांनी उपलब्ध असेल. तर राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 30.50 रुपये कमी होऊन 1764.50 रुपये, कोलकातामध्ये 32 रुपये कमी होऊन 1879 रुपये, चेन्नईमध्ये 30.50 रुपये कमी होऊन 1930 रुपये झाली आहे.

दोन महिने वाढ, निवडणुकीआधी दिलासा

दरम्यान, 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये गेल्या दोन महिन्यात (फेब्रुवारी आणि मार्च) वाढ करण्यात आली होती. आज किंमतींमध्ये कपात करण्यासाठी हाच गॅस सिलिंडर मुंबईत 1749 रुपये, दिल्लीत 1795 रुपये, कोलकातामध्ये 1911 आणि चेन्नईमध्ये 1960.50 रुपयांना मिळत होता.

घरगुती गॅस सिलिंडरचे दर ‘जैसे थे’

14 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईमध्ये याची किंमत 802.50 रुपये, दिल्लरीमध्ये 803 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;