Ratnagiri accident – मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; मंडणगडजवळ कार खड्ड्यात कोसळून दोघांचा मृत्यू, दोघे जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्याती मंडणगड येथे चालकाचे नियंत्रण सुटलेली कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात कोसळली आणि दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. जखमींपैकी एकावर मंडणगड येथे उपचार सुरू असून दुसऱ्याला उपचारांसाठी महाड येथे हलविण्यात आले आहे.
मुंबईहून मंडणगडकडे येणाऱ्या पांढर्या रंगाची वॅगनर कार (क्र एमएच 08, एएक्स 9589) चालकाला डुलकी लागल्याने रस्त्याच्या कडेला असणार्या खड्ड्यात कोसळली. या अपघातात शंकर वसंतु करमकर (वय – 46, रा. राजापूर, ता. दापोली) आणि हर्षदा हेरंब जोशी (वय – 68 रा. टिळक आळी, रत्नागिरी) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रमोश मुकुंद लिमये (वय – 65) आणि ओंकार प्रमोद लिमये (वय – 35, दोघे मुळ गाव पाडले, ता. दापोली, सध्या रा. केळशी) हे बाप-लेख जखमी झाले.
प्रमोद यांना पुढील उपचारांसाठी महाड येथे हलविण्यात आले आहे. या घटनेची मंडणगड पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हेड कॉन्स्टेबल वैशाली सुकाळे करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List