एमओएची आगामी वार्षिक सर्वसाधारण सभा बेकायदा! लवकरच कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक घ्यावी लागणार

एमओएची आगामी वार्षिक सर्वसाधारण सभा बेकायदा! लवकरच कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक घ्यावी लागणार

>> पुणे, क्रीडा प्रतिनिधी

पक्षचोरी करून महाराष्ट्राच्या सत्तेत घटनाबाह्य सरकार बसलेले असतानाच, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) यंदाच्या (२०२५-२९) निवडणुकीतही असाच घटनाबाह्य प्रकार बघायला मिळाला आहे. चक्क निवडणुकीच्या दिवशी कुठलेही मतदान न होता, निवडणूक प्रक्रियाच गुंडाळण्याचा अजब प्रकार २ ऑक्टोबरला बघायला मिळाला. आता याच घटनाबाह्य ‘एमओए’चे पुन्हा नव्याने अध्यक्ष झालेल्या अजित पवार यांनी येत्या रविवारी (दि.२३) संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली आहे. मात्र, ‘एमओए’ची ही वार्षिक सर्वसाधारण सभाच बेकायदा असून, लवकरच कोर्टाच्या आदेशानुसार नवीन निवडणूक प्रक्रिया राबवावी लागणार असल्याचे महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचिव सूर्यकांत पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘एमओए’ची निवडणूक किती हश्यास्पद आणि मनमानी पद्धतीने झाली आहे, याची पोलखोलच त्यांनी धर्मदार आयुक्तांनी दिलेल्या निकालाची प्रत सादर करुन केली.

राजकिय दबाव अन् क्रीडा खात्याचा वरदहस्त

मंगळवारी झालेल्या या पत्रकार परिषदेसाठी सूर्यकांत पवार यांच्यासह महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष लालूभाई शेख, हॉकी महाराष्ट्राचे सहसचिव रणवीर सिंग, महाराष्ट्र जलतरण संघटनेचे राजेंद्र पालकर आदी मान्यवर उपस्थित होते. ‘घटनाबाह्य पद्धतीने चौथ्यांदा ‘एमओए’चे अध्यक्ष बनलेल्या अजित पवार यांनी घटनेत नसलेल्या वरिष्ठ उपाध्यक्षपती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधल मोहोळ यांची निवड केली असून, संघटनेच्या संकेतस्थळावर त्यांनी आपली नवी कार्यकारिणी आणि पदाधिकार्‍यांची निवडही जाहीर केली आहे’, असे सूर्यकांत पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘प्रचंड राजकिय दबाव आणि शासकीय क्रीडा खात्याच्या वरदहस्तामुळे ‘एमओए’मध्ये गेल्या १०-१२ वर्षांपासून नुसता आर्थिक भ्रष्टाचाराचा धुमाकूळ सुरू आहे. धर्मदाय आयुक्तांनी ‘एमओए’चा २०२१ ते २०२५चा बदल अर्ज (चेंज रिपोट) फेटाळला असल्याने या पदाधिकार्‍यांना निवडणूक घेण्याचा अधिकारच उरत नाही, असेही पवार यांनी निदर्शनास आणून दिले. एवढेच नाही, तर २०१३पासूनचा बदल अर्ज अमान्य झाल्याने त्यानंतर ‘एमओए’मध्ये नव्याने समाविष्ठ केलेल्या राज्य संघटनाही बेकायदा आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आम्हाला राजकीय नेत्यांची गरज, पण..

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला (एमओए) निधी मिळवून देण्यासाठी राजकीय नेत्यांची नक्कीच गरज असते. त्यांनी संघटनेच्या पदावरही काम करायला हरकत नाही. मात्र, क्रीडा लवाद आणि ‘एमओए’च्या घटनेच्या चौकटीतच त्यांनी काम करायला हवे. क्रीडा लवादानुसार दोन टर्मपर्यंतच संघटनेच्या पदावर राहता येते. मात्र, अजित पवार यांनी घटनेच्या नियमांना केराची टोपली दाखवत चौथ्यांदा ‘एमओए’चे अध्यक्षपद भुषविले आहे. हे साफ चूकीचे आहे, असे हॉकी महाराष्ट्राचे सहसचिव रणवीर सिंग यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मूळव्याधावर रामदेव बाबांनी सांगितला उपाय, फक्त ‘ही’ तीन पाने, जाणून घ्या मूळव्याधावर रामदेव बाबांनी सांगितला उपाय, फक्त ‘ही’ तीन पाने, जाणून घ्या
तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कुणालाही मूळव्याध असेल तर ही बातमी आधी वाचा. शरमेमुळे रुग्ण या आजाराबद्दल उघडपणे बोलू शकत नाहीत....
थंडीच्या दिवसात तुमच्याही हातापायांची बोटे सुजतात? तर आतापासूनच घ्या अशी काळजी
गायी-म्हशीच्या दूधाहून जास्त कॅल्शियम देतो हा एक पदार्थ, हाडांना करतो मजबूत
गणपतीपुळे समुद्रात पर्यटक का बुडतात यांचा तांत्रिक बाजूने अभ्यास करा -जिल्हाधिकारी मनुज जिंदल
Ratnagiri Municipal Council Election- नगराध्यक्ष पदाचा एक, नगरसेवक पदाचे दहा अर्ज बाद
Cloudflare Down – एक्स, फेसबुक, चॅटजीपीटीसह अनेक साइट्स डाऊन; नेटकरी त्रस्त
Ratnagiri News – संगमेश्वर येथे राष्ट्रीय महामार्ग दिवसा बंद ठेवण्यास परवानगी नाकारली, पूलाचे गर्डर रात्रीच्या वेळी चढवणार