ठाणे, पालघर, रायगडमध्ये उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन; 15 नगर परिषदा, 1 नगरपंचायतसाठी 2800 अर्ज दाखल

ठाणे, पालघर, रायगडमध्ये उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन; 15 नगर परिषदा, 1 नगरपंचायतसाठी 2800 अर्ज दाखल

मोठे शक्तिप्रदर्शन करत आज शेवटच्या दिवशी ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील १५ नगर परिषदा आणि १ नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आले. तिन्ही जिल्ह्यांतील नगरसेवकांच्या ४३३ आणि १६ नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या २८०० हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उद्या मंगळवारी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून २५ नोव्हेंबर रोजी माघार आहे. माघारीनंतरच निवडणूक दुरंगी की बहुरंगी हे चित्र स्पष्ट होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर तर पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, पालघर नगर परिषद आणि वाडा नगरपंचायतशिवाय रायगड जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, कर्जत, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन आणि उरण नगर परिषदेसाठी निवडणूक होत आहे. कोरोनाचे संकट आणि आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिल्यामुळे तीन ते सहा वर्षे निवडणुका झाल्या नव्हत्या. प्रशासकाच्या हाती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार होता. अखेर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बऱ्याच कालखंडानंतर निवडणुका होत असल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विक्रमी संख्येने अर्ज दाखल झाले आहेत.

वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी १० तर १७जागांसाठी १०० उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या निकिता गंधे यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. रोहा अष्टमी नगर पारषदेसाठी शिवसेनेच्या नेहा गुरव यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी तालुका प्रमुख नितीन वारंगे, उपतालुकाप्रमुख सचिन फुलारे, रमेश विचारे उपस्थित होते.

खोपोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या २८ जागांसाठी ११० उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सर्वच पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नव्हता. माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अलिबाग नगर परिषदेच्या २१ जागांसाठी १२४ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ४ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दंड थोपटले असून शिवसेना शहरप्रमुख संदीप पालकर व श्वेता पालकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम पाटील यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केले. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, अलिबाग तालुकाप्रमुख शंकर गुरव, मुरुड तालुकाप्रमुख नौशाद दळवी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तम पिंपळे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हाप्रमुख गिरीश राऊत विकास मोरे, ममता चेंबूरकर, भाविका पाटील, गीता ठाकूर, कैलास ठाकूर, सुभाष मोरे उपस्थित होते. नगराध्यक्षासाठी एकूण १० अर्ज तर नगरसेवकासाठी १७२ अर्ज दाखल करण्यात आले.

डहाणू नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संजय पाटील यांनी अर्ज दाखल केला.

श्रीवर्धनच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अॅड. अतुल चोगले यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. सोबत उपतालुकाप्रमुख जुनेद दुस्ते व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

रोह्यात अजित पवार गटात बंडखोरी

  • अजित पवार गटाने रोह्यात अनेक माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारल्याने कार्यकत्याँमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. माजी नगरसेविका साजिया मोरबेकर आणि शहर कार्याध्यक्ष दिवेश जैन यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
  • कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार प्रिया गवळी यांनी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ऋता आव्हाड, विद्या वेखंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, शहरप्रमुख किशोर पाटील आदी उपस्थित होते.
  • रोहा नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेहा ओमकार गुरव यांनी अर्ज दाखल केला. यावेळी तालुकाप्रमुख नितीन वारंगे, उपतालुकाप्रमुख सचिन फुलारे, रमेश विचारे उपस्थित होते.
  • अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी अंजली राऊत यांनी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, राष्ट्रवादीचे महेश तपासे, रमेश डोंगरे, महेंद्र कांबळे, प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.
  • मुरुड नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी २ तर नगरसेवकपदासाठी २६ अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आदेश डफळ यांच्याकडे अर्ज दाखल केले.
  • डहाणू नगर परिषदेच्या २७ जागांसाठी ११८ अर्ज दाखल झाले आहेत. तर उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष, सदस्यपदाच्या २२ जागांसाठी ८७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
  • पालघर नगराध्यक्षासाठी एकूण १० अर्ज तर नगरसेवकासाठी १७२ अर्ज दाखल करण्यात आले.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

छत्तीसगड-आंध्र सीमेवर चकमक; 1 कोटींचे बक्षीस असलेला कुख्यात नक्षली हिडमासह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा छत्तीसगड-आंध्र सीमेवर चकमक; 1 कोटींचे बक्षीस असलेला कुख्यात नक्षली हिडमासह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवरील अल्लुरी सीताराम जिल्ह्यातील जंगलामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले असून...
दिल्ली स्फोटप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, अल फलाह ट्रस्टसंबंधित 24 ठिकाणी छापे
पाकिस्तानी रॅपरने नेपाळमध्ये फडकवला ‘तिरंगा’; पाकड्यांनी केलं ट्रोल, व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या आमदाराने पुन्हा त्याच रस्त्याचे भूमिपूजन करत असताना उडाला गोंधळ, काँग्रेससह स्थानिकांची भाजप आमदारासोबत शाब्दिक चकमक
उकडलेल्या चण्याचे पाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे
सोलो ट्रिप करणाऱ्या तरुणीसमोर अश्लील चाळे; शरीरसंबंधांची मागणी करत हस्तमैथून केले, कुठे घडला हा संतापजनक प्रकार?
शिक्षा सुनावली पण अंमलबजावणीच नाही, शेख हसीना यांना बांग्लादेशला सुपुर्द करण्याची शक्यता कमीच