निवडकर्ते गोंधळलेले, संघ निवडीमध्ये स्पष्टतेचा अभाव! दिग्गज खेळाडूने गंभीर, आगरकरची पिसं काढली

निवडकर्ते गोंधळलेले, संघ निवडीमध्ये स्पष्टतेचा अभाव! दिग्गज खेळाडूने गंभीर, आगरकरची पिसं काढली

कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटीमध्ये हिंदुस्थानला पाहुण्या दक्षिण आफ्रिकेकडून लाजिरवणा पराभव स्वीकारावा लागला. या कसोटीसाठी फिरकीला साथ देणारी खेळपट्टी बनवण्यात आली. मात्र या फिरकीत हिंदुस्थानचा संघच अडकला आणि आफ्रिकेने 30 धावांनी विजय मिळवला. या कसोटीनंतर निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनावर टीकेची झोड उठली आहे. हिंदुस्थानचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनीही मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्यावर निशाणा साधला.

कोलकाता कसोटीतील पहिल्या दोन दिवसावर हिंदुस्थानचे वर्चस्व होते. मात्र तिसऱ्या दिवशी हिंदुस्थानचा संघ 124 धावांचा पाठलाग करताना 93 धावांमध्ये बाद झाला आणि हिंदुस्थानचा पराभव झाला. घरच्या मैदानावर याआधी हिंदुस्थानला न्यूझीलंडने व्हाईट वॉश दिला होता. त्यानंतर आता आफ्रिकेने 15 वर्षानंतर हिंदुस्थानमध्ये कसोटी जिंकली. याला निवडकर्ते जबाबदार असल्याचे व्यंकटेश प्रसाद यांनी म्हटले. तसेच गंभीरने प्रशिक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यापासून कसोटी क्रिकेटमध्ये संघाच्या खराब कामगिरीवरही त्यांनी प्रकाश टाकला.

काय म्हणाले व्यंकटेश प्रसाद?

व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये (वन डे आणि टी-20) आपली कामगिरी उत्कृष्ट असली तरी असे नियोजन राहिले तर आपण स्वत:ला सर्वोत्तम कसोटी संघ म्हणू शकत नाही. निवडकर्त्यांकडे स्पष्ट दृष्टीकोन नाही आणि अतिरेकी धोरणात्मक विचारसरणी उलटी ठरत आहे. इंग्लंडविरुद्धच्या अनिर्णित मालिकेचा अपवाद वगळता यंदा कसोटीतील निकाल निराशाजनक राहिले आहेत, असे व्यंकटेश प्रसाद म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

छत्तीसगड-आंध्र सीमेवर चकमक; 1 कोटींचे बक्षीस असलेला कुख्यात नक्षली हिडमासह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा छत्तीसगड-आंध्र सीमेवर चकमक; 1 कोटींचे बक्षीस असलेला कुख्यात नक्षली हिडमासह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवरील अल्लुरी सीताराम जिल्ह्यातील जंगलामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले असून...
दिल्ली स्फोटप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, अल फलाह ट्रस्टसंबंधित 24 ठिकाणी छापे
पाकिस्तानी रॅपरने नेपाळमध्ये फडकवला ‘तिरंगा’; पाकड्यांनी केलं ट्रोल, व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या आमदाराने पुन्हा त्याच रस्त्याचे भूमिपूजन करत असताना उडाला गोंधळ, काँग्रेससह स्थानिकांची भाजप आमदारासोबत शाब्दिक चकमक
उकडलेल्या चण्याचे पाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे
सोलो ट्रिप करणाऱ्या तरुणीसमोर अश्लील चाळे; शरीरसंबंधांची मागणी करत हस्तमैथून केले, कुठे घडला हा संतापजनक प्रकार?
शिक्षा सुनावली पण अंमलबजावणीच नाही, शेख हसीना यांना बांग्लादेशला सुपुर्द करण्याची शक्यता कमीच