सोलो ट्रिप करणाऱ्या तरुणीसमोर अश्लील चाळे; शरीरसंबंधांची मागणी करत हस्तमैथून केले, कुठे घडला हा संतापजनक प्रकार?
हल्ली एकट्याने फिरण्याचे फॅड चांगलेच वाढले आहे. पुरुषांसह महिलाही अनेक ठिकाणी सोलो ट्रिप करताना दिसतात. मात्र सोलो ट्रिप करताना महिलांना अनेक आव्हानांचाही सामना करावा लागलो. नवीन ठिकाणी महिलांना सुरक्षेची काळजी घ्यावी लागते. सोशल मीडियावर सोलो ट्रिप कितीही सुंदर वाटत असले तरी प्रत्यक्षात अशा काही घटना कानावर येतात ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आताही अशीच एक घटना समोर आली आहे. श्रीलंकेमध्ये पर्यटनासाठी आलेल्या न्यूझीलंडच्या तरुणीची स्थानिक व्यक्तीने छेड काढली आणि तिच्यासमोर अश्लील चाळेही केले. हा प्रकार तरुणीच्या कॅमेऱ्यातही कैद झाला.
न्यूझीलंडहून पर्यटनासाठी आलेल्या तरुणीला श्रीलंकेत वाईट अनुभव आला. एका स्थानिक तरुणाने तिचा पाठलाग केला. एवढेच नाही तर भर रस्त्यामध्ये तिची गाडी रोखून तिच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली आणि तिच्यासमोरच हस्तमैथून करू लागला. याचा व्हिडीओ तरुणीने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी 23 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नक्की काय घडलं?
पीडित तरुणीने घटनेच्या दिवशी नक्की काय झाले हे सांगितले. समुद्रामध्ये स्विमिंग केल्याने दिवसाची सुरुवात चांगली झाली होती, पण नंतर वेगळेच घडले. माझ्या गाडीपुढे एक स्कूटर चालत होती आणि तो मुद्दाम गाडी स्लो करत होता. आम्ही त्याला ओव्हरटेक केल्यावर तो पुन्हा स्पिड वाढवून आमच्या पुढे जायचा. सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तो वारंवार तसे करू लागल्याने मला अस्वस्थ वाटू लागले, असे तरुणीने म्हटले.
काहीवेळाने तो निघून गेला असे वाटले, पण नंतर तो पुन्हा समोर आला. सुरुवातीला तो मित्रासारखा वागत होता, नंतर त्याचे वर्तन अचानक बदलले. पाणी पिण्यासाठी गाडी थांबवल्यावर तरुण तिथेही आला आणि माझ्याशी बोलू लागला. भाषेची समस्या होती, पण तो मित्रासारखा बोलत असल्याने मी देखील त्याच्याशी काही मिनिट बोलले. परंतु त्याने मला कुठे थांबली आहेस असे विचारले. त्याच्या मनात काय आहे हे मला कळले. यानंतर तरुणाने माझ्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली, असेही तरुणीने सांगितले.
मी त्याला नकार देताच त्याचे वर्तन आणखी बदलले आणि चिडचिड सुरू झाली. त्याने माझ्यासमोरच हस्तमैथून सुरू केले. यामुळे मी खूपच घाबरले. संपूर्ण ट्रिपमध्ये मला त्या भीतीदायक अनुभवाची आठवण येत होती, असेही तिने म्हटले. या घटनेमुळे आपला आत्मविश्वास कमी झाल्याचेही तिने म्हटले. एकट्याने प्रवास करणे सुंदर आहे. यामुळे तुम्ही मनाने खंबीर होता. पण सतर्क राहणेही गरजेचे असल्याचेही तिने म्हटले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List