हेमंत जीवंत है, भाजपा का अंत है ! भाजप नेत्याच्या पोस्टला JMM चे जबरदस्त प्रत्युत्तर
बिहार निवडणूक निकालांचा परिणाम झारखंडमध्ये जाणवत आहे. भाजप नेते अजय आलोक यांनी एक पोस्ट करत झारखंड मुक्ती मोर्चाला डिवचण्याचा प्रयत्न केला. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की,अब नया बम झारखंड में, हेमंत अब जीवंत होंगे’. भाजप नेते अजय आलोक यांच्या पोस्टला JMM नेते आणि पक्षाचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हेमंत जीवंत है, भाजपा का अंत है ! या पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
बिहारमध्ये पाशबी बहुमत मिळाल्याने भाजप नेते आनंदाच्या भरात बोताल वक्तव्ये करत आहे. त्यातच भाजप नेत्याने एक पोस्ट पोस्ट केली आहे ज्याची झारखंडच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. बिहार भाजप नेते आणि प्रवक्ते डॉ. अजय आलोक म्हणाले, अब नया बम झारखंड में, हेमंत अब जीवंत होंगे’ म्हणजेच आता झारखंडमध्ये नवा धमका होईल आणि हेमंत जिवंत होईल. त्यांच्या या वक्तव्याचा संबंध झारखंडमधील सत्ताबदलाशी जोडण्यात येत आहे. मात्र, या आलोक यांच्या पोस्टला JMM ने प्रत्युत्तर देत सत्ताबदलाची कोणतीही शक्यता फेटाळून लावली. तसेच काँग्रेसनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
झारखंड प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस आलोक कुमार दुबे म्हणाले की, हेमंत सोरेन यांना तुरुंगात पाठवू इच्छिणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी. हे झारखंड आहे, येथील जनतेला सर्व काही माहित आहे. हेमंत सोरेन आहेत, म्हणूनच तुमचे फसवे राजकारण अपयशी ठरत आहे. एकच मुख्यमंत्री अनेक मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
ते म्हणाले की येणाऱ्या काळात जनता भाजपला योग्य उत्तर देईल आणि झारखंडमध्ये लोकशाही शक्ती अधिक मजबूत होतील. भाजप नेत्याच्या दाव्याला झामुमोने उत्तर दिले आहे. पक्षाचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी X वर लिहिले आहे की, हेमंत जीवंत है, भाजपा का अंत है ! म्हणजेच हेमंत आहेत आणि म्हणूनच भाजपचा अंत निश्चित आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List