राहता नगर परिषद महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, शिवसेनेची माहिती
राहता नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी संबंध नाही अशी माहिती पक्षाने दिली आहे. तसेच राहता नगर परिषदेची निवडणूक शिवसेना महाविकास आघाडीतूनच लढणार असेही पक्षाने म्हटले आहे.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने पत्रक प्रसिद्ध करून म्हटले आहे की, माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार कळविण्यात येत आहे की, शिर्डी लोकसभेतील राहता नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक २०२५ करता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेस पक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे महाविकास आघाडी म्हणून लढवीत आहेत. असे असतानाही आमच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, राहता नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जोडपत्र-1 ची प्रत व जोडपत्र-2 नुसार काही उमेदवारांनी अध्यक्ष व सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अशाप्रकारे अर्ज दाखल करणारे नगराध्यक्ष पदाकरिता 1) राजेंद्र सखाराम पठारे नगरसेवक पदाकरिता 2) सागर निवृत्ती लुटे 3) उज्वला राजेंद्र होले हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्राथमिक सदस्य देखील नसून त्यांचा पक्षाशी दुरान्वयानेही संबंध नाही असेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.

Comment List