तणावात असाल तर, शिल्पा शेट्टीने सांगितलेले हे आसन नक्की करुन बघा
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत व्यायाम, योगसाधना याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. आता लोकांना दिवसातून 8 ते 9 तास एकाच ठिकाणी बसून काम करावे लागते. यामुळे खांदे, मान, पाठ, कंबर आणि पाय दुखणे, मानसिक त्रास यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. या सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे योगा करणे. बॉलीवूडची फिटनेट आयकॉन शिल्पा शेट्टी योगामुळेच वयाच्या 50 व्या वर्षीही एकद फिट आहे. शिल्पा नेहमीच तिच्या चाहत्यांना योगा करण्यासाठी वेगवेगळ्या टीप्स देत त्यांना प्रोत्साहन देत असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यायामाचे कधी फोटो तर कधी व्हिडीओ शेअर करत त्याबाबत अचूक माहिती देत असते. पुन्हा एकदा, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने एका योगासनाबाबत माहिती दिली आहे. हे योगासन केल्यामुळे शरीराची ताकद, लवचिकता आणि मानसिक आरोग्याला फायदा होतो, असे शिल्पाने व्हिडीओतून सांगितले आहे.
धावपळीच्या जीवनशैलीत कामाच्या व्यापामुळे शारिरीक आणि मानसिक ताणतणावात वाढ होत चालली आहे. यावर उपाय म्हणून शिल्पाने एक योगासनाबाबत उत्तम माहिती दिली. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे योगासन केले तर ताणतणाव कमी होऊन स्नायू बळकट होण्यास मदत होते. या योगासनामुळे कंबर, पाय आणि मांडीच्या स्नायूंमधील ताण कमी होतो आणि लवचिकता वाढते. मन आणि शरीर यांच्यातील समन्वय देखील सुधारतो. नियमित योगासनामुळे ताण कमी होतो आणि शरीराला असंख्य फायदे मिळतात.
दरम्यान योगासन करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यांना पाठीचे किंवा पायाचे त्रास असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने योगासन करावे, असा सल्ला अभिनेत्री शिल्पा शेट्टीने चाहत्यांना दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List