कळवा, मुंब्रा, दिवा कचऱ्यात; शिवसेनेचे दिव्यात आंदोलन
गेल्या चार दिवसांपासून कळवा, मुंब्रा आणि दिव्यातला कचरा उचलला गेला नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग लागले आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याने रोगराई वाढली आहे. पालिकेचे स्वतःचे डम्पिंग ग्राऊंड नसल्याचे कारण पुढे करीत ठेकेदारांकडून कचरा उचलला जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
दिवा गावातील प्रत्येक चौकाचौकात कचराकोंडी झाली आहे. कचरा साचल्याने भटक्या कुत्र्यांसह उंदरांचा प्रादुर्भाव वाढल्याने दुर्गंधीसहित रोगराई वाढली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेत आज ठाणे पालिकेच्या बेफिकीर कारभाराविरोधात आंदोलन छेडले. कचरा उचलला गेला नाही तर आम्ही टॅक्स भरणार नाही असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला. कळवा प्रभाग समितीचे उपायुक्त सचिन सांगळे व सहाय्यक आयुक्त ललिता जाधव यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, विधानसभा प्रमुख अॅड. रोहिदास मुंडे, विधानसभा संघटक योगिता नाईक, शहर संघटक ज्योती पाटील, प्रियंका सावंत, स्मिता जाधव, युवा अधिकारी सुयोग राणे, विभागप्रमुख हेमंत नाईक, रवी रसाळ, योगेश निकम, शंकर राणे, शशिकांत कदम, राजेंद्र शिरसेकर, तेजस पोफळे, उमेश भाणसे, संतोष कदम, अनिल पवार, विलास उतेकर, नितीन सावंत, संजय डोंगरे, सुनील मेटकर, जितेंद्र यादव आदी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List