Ratnagiri News – चिपळूण नगर परिषद निवडणूक, शिवसेनेकडून नगरसेवकपदासाठी 15 उमेदवारांचे अर्ज दाखल
चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. नगरपरिषदेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार सज्ज झाले आहेत. आज (17 नोव्हेंबर 2025) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. शिवसेनेच्या वतीने आज 15 उमेदवरांनी अर्ज भरले. उद्या उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संकेत शिंदे, इरशत गोठे, मजर पेचकर, निकेत हरवंदे, वैशाली शिंदे, अजय भालेकर, वैशाली कदम, शैलेश टाकळे, भक्ती कुबडे, संजय गोताड, साक्षी लोटेकर (अपक्ष) सपना पवार, सचिन उर्फ भैय्या कदम आणि फिरदोस कवारे यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List