Photo – शिवतीर्थावर निष्ठा आणि श्रद्धेचा महासागर!

Photo – शिवतीर्थावर निष्ठा आणि श्रद्धेचा महासागर!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 13 व्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थ येथील शक्तिस्थळावर नतमस्तक होण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक पोहचले. शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून शिवप्रेमी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी मोठय़ा रांगा लावल्या होत्या. शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींची पावले शिवतीर्थावरील शक्तीस्थळाकडे वळली. अमर रहे, अमर रहे, बाळासाहेब ठाकरे अमर रहेहिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असोएकच ब्रॅण्डठाकरे ब्रॅण्डअशा जोरदार घोषणा यावेळी शिवसैनिकांकडून देण्यात आल्या. यावेळी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.  

मान्यवरांची उपस्थिती

 

शक्तीस्थळावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, चंदूमामा वैद्य, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शक्तिस्थळावर श्रद्धांजली वाहिली.

रश्मी ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून शिवसेनाप्रमुखांना वंदन केले.

शक्तिस्थळावर शिवसेना नेते युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे नतमस्तक झाले.

तेजस ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला वंदन केले. 

प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुखांना मानवंदना दिली. शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांच्या तसबिरीला फुले वाहून ते तिथे नतमस्तक झाले. यावेळी आमदार सुनील राऊत, संदीप राऊत, उपनेते संजय सावंत त्यांच्यासोबत होते.

शक्तीस्थळावर मुख्य वितरक दांगट न्यूजपेपर एजन्सीचे चारुदत्त बाजीराव दांगट यांनी अभिवादन केले.

शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात भव्य रांगोळी रेखाटण्यात आली होती. ‘जरी माझ्या पार्थिवाला शिवतीर्थावर अग्नी दिला, तरी तुम्ही या ज्वालेची मशाल अशीच धगधगती ठेवा’, असा संदेश रांगोळीतून देण्यात आला.

शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला आदरांजली वाहताना शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू.

शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी शिवसेनाप्रमुखांना वंदन केले.

पोलिसांनीही शिवसेनाप्रमुखांना वंदन केले.

अनेक शिवसैनिक भगवा हाती घेऊन नतमस्तक झाले.

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर अभिवादन करताना…

ज्येष्ठ शिवसैनिकांनी आदरांजली वाहिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उज्ज्वला थिटे यांनी गनिमी काव्याने दाखल केला अर्ज, गावाबाहेर गुंडांची गस्त… पहाटे 5 वाजता पोहचल्या नगरपंचायत कार्यालयात उज्ज्वला थिटे यांनी गनिमी काव्याने दाखल केला अर्ज, गावाबाहेर गुंडांची गस्त… पहाटे 5 वाजता पोहचल्या नगरपंचायत कार्यालयात
मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून अजित पवार गट व भाजपमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले आहे. अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध...
Photo – शिवतीर्थावर निष्ठा आणि श्रद्धेचा महासागर!
तेथे कर माझे जुळती! शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी शिवतीर्थावर शिवसैनिकांची रीघ
महाराष्ट्रात 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका, अन्यथा निवडणुका रोखू! सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला फटकारले
शेतकऱ्यांना कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही, देवेंद्र फडणवीस म्हणतात
घाटकोपरच्या शाळेत 20 विद्यार्थ्यांना वडापाव बाधला
शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, मानवतेविरुद्ध गुन्हय़ाचा ठपका